By NITIN MORE | प्रकाशित: जानेवारी 11, 2020 12:30 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : बुलढाणा
बुलढाणा - बुलढाणा जिल्हयातील संग्रामपूर गावात असलेल्या स्मशानभूमीजवळ एसटी बस आणि ट्रॅक्टर यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत अपघात झाल्याची घटना सकाळी सातच्या सुमारास घडल्याचे उघडकीस आला आहे. या अपघातामध्ये १२ जण जखमी झाल्याची माहिती तामगाव पोलिसांनी दिली आहे.
जळगाव आगाराची बस सोनाळा-बुलढाणा-वरवटकडून जळगाव जमोदकडे जात असताना संग्रामपूरकडून फार वेगात येणार ट्रॅक्टर आणि एसटी बस यांच्यात धडक बसून बसचालकसह तीन जणांची गंभीर परिस्थिति आहे. बसचालक सुनील इंगळे यांच्याबरोबर दोन गंभीर जखमींना आकोला येथे असलेल्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
या घटनेची माहिती मिळताच तामगाव पोलिस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी पोहचले. पोलिसांच्या माहितीनुसार जखमीं झालेल्यापैकी काही विद्यार्थींचाही समावेश असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
तेहरान, इराण - युक्रेनच्या विमानाचा अपघात झाला होता की ते पाडण्यात आ....
अधिक वाचा