By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 03, 2020 01:48 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : sillod
यात्रेकरूंना गंगासागर येथे घेऊन जाणारी खासगी बस उलटून एकाचा मृत्यू झाला आहे. तर 21 जण गंभीर जखमी झाले आहेत. पालोदजवळ ही घटना घडली.
दरम्यान या यात्रेकरून मध्ये दामोदर लक्ष्मण खैरनार असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर सखुबाई कचरू पांडव, सविता अरुण परे, इंदूबाई कैलास महाजन, कमल तुकाराम सानप, सुनंदा रेवती सांगळे, विजया दिनकरराव शेळके, सुनंदा नामदेव मोरे, निर्मळ संतोष खैरनार, अरुण गोपाळ गांगुर्डे, मंदाकिनी विजय पगारे, भास्कर कारभारी गांगुर्डे, सुमन काळू कडाळे, सुनंदा सुखदेव शिंदे, सुखदेव खडु शिंदे, कुसुम निंबा पवार, जिजाबाई बाबुराव नर्गे, शकुंतला अर्जुन बोडखे, ललिता अरुण गांगुर्डे, मंगुला गोरखनाथ पगारे, सीमा भिकाजी केवट, कोळीबा जनार्दन घाटे, काळू झुंबर कडाळे अशी जखमींची नावे आहेत. जखमींमधील 13 जण गंभीर जखमी असून, त्यांना औरंगाबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त खासगी बस यात्रेकरुंना गंगासागर येथे घेऊन निघाली होती. पालोदजवळ खराब रस्ते, दाट धुके आणि नशेत असलेल्या चालकाचे वाहनवरील नियंत्रण सुटल्याने हा धक्कादायक अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
नोव्हेंबर महिन्यात राज्यात राजकीय उलथापालथ सुरु असताना जगाचा पोशि....
अधिक वाचा