ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

भांडुपमध्ये विचित्र अपघातात एकाचा मृत्यू

By PRIYANKA BAGAL | प्रकाशित: मार्च 31, 2019 03:42 PM 2019-02-12T14:15:30+5:30

भांडुपमध्ये विचित्र अपघातात एकाचा मृत्यू

शहर : मुंबई

भांडुपच्या नरदास नगर परिसरात घडलेल्या विचित्र अपघातात एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. भांडुपमध्ये मातीने भरलेला डंपर टेंभीपाडा रोडवर चढणीवर जात असताना अचानक वाहनचालकाचे नियंत्रण सुटले आणि तो उतारावरून खाली येत एका टेम्पोवर आदळला आहे. त्याठिकाणी असलेल्या एका व्यक्तीला टेम्पोची धडक लागून तो पंधरा फूट खाली कोसळला.  संतापजनक बाब म्हणजे ही जखमी व्यक्ती बराच काळ दुर्घटनास्थळी जखमी अवस्थेत पडून होती. माञ, जमलेल्या बघ्यांच्या गर्दीमधून एकानेही त्याला रुग्णालयात हलवण्याची माणुसकी देखील दाखवली नाही. याउलट या इसमाचे फोटो काढण्यातच अनेकजण व्यस्त होते. अखेर अजिंक्य भोसले या दक्ष नागरिकाने आणि त्याच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी व्यक्तीला नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. सध्या पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. 

मागे

जेट एअरवेजचे वैमानिक १ एप्रिलपासून काम बंद आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम
जेट एअरवेजचे वैमानिक १ एप्रिलपासून काम बंद आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम

जेट एअरवेजचे वैमानिक १ एप्रिलपासून काम बंद आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम असल्य....

अधिक वाचा

पुढे  

आजपासून  नवं आर्थिक वर्ष २०१९-२० ला सुरूवात, बदलणार हे १० नियम ...
आजपासून नवं आर्थिक वर्ष २०१९-२० ला सुरूवात, बदलणार हे १० नियम ...

आर्थिक वर्ष २०१८-१९ संपलंय आणि आजपासून नवं आर्थिक वर्ष २०१९-२० ला सुरूवात हो....

Read more