By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 10, 2019 12:25 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : बीड
परळी वैजनाथ येथे पाणी टंचाईने उग्र रूप धारण केले असून, पाणी भरण्याच्या धडपडीत लोकांना जीव गमवावा लागत आहे. आज सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास संजय विडेकर (48) रा. हालगे गल्ली परळी वैजनाथ यांचा हौदात उतरून पाणी भरताना मोटारीचा शॉक बसून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. विशेष म्हणजे परळीच्या नगराध्यक्षांच्या प्रभागात घडलेली ही दुर्दैवी घटना घडली आहे. नगर परिषदेकडून परळीत दहा दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे पाण्याची साठवणूक करण्यासाठी नागरिकांकडून धडपड करण्यात येत आहे. यातूनच हौदात मोटार लावून पाणी भरताना वीजेचा धक्का बसून संजय विडेकर यांना प्राण गमावावा लागला. विडेकर यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. ते पानटपरी चालवून घराचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या मृत्यूने कुटुंब उघड्यावर आले आहे. पाणी टंचाईच्या परिस्थितीने विडेकर यांचा बळी गेल्याने हालगे गल्ली भागातील नागरिकांत हळहळ व्यक्त होत आहे.
अयोध्याप्रकरणी मध्यस्थी प्रक्रियेच्या आदेशानंतर आज पहिल्यांदाच सुप्रिम ....
अधिक वाचा