By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 29, 2019 12:11 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
केंद्र सरकार देशभरात एका रेशनकार्डवर (शिधापत्रिका) शिधा देण्याची योजना आखत आहे. सरकार 'वन नेशन वन कार्ड' योजना लागू करण्यासाठी पाऊल उचलत असल्याचे अन्न पुरवठा मंत्री विलास पासवान यांनी म्हटले. सरकार देशात अन्न पदार्थांवर 1.45 लाख कोटी रुपयांची सबसिडी देणार असल्याचेही ते म्हणाले. गरीबांना 2 रुपये प्रति किलो दराने गहू आणि 3 रुपये प्रति किलो दराने तांदूळ दिला जात असल्याचेही ते म्हणाले.
मोठ्या प्रमाणात मागणी असताना देखील अन्नाच्या पुरवठ्यात काही बदल होणार नाही. सरकार एक देश एक कार्ड योजना जनतेपर्यंत पोहोचवणार आहे. यामुळे गरीब व्यक्ती देशातील कोणत्याही शहरात गेल्यास त्यांना कोणत्याही अडचणी शिवाय शिधा मिळावा हे यामागचे उद्दीष्ट आहे.
प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घर बनवण्यासाठी दिली जाणारी 1.50 लाख रुपयांची रक्कम वाढवण्याची सध्या कोणती योजना नसल्याचे शहर विकास मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी राज्यसभेत स्पष्ट केले. 2022 पर्यंत प्रत्येकाला घर देण्याच्या योजनेअंतर्गत या आर्थिक वर्षात 60 लाख घर बनवण्याची योजना आहे. तर 2020-21 आणि 2021-22 क्रमश: 70 आणि 65 लाख घर बनवले जातील. सरकार एका घरासाठी दीड लाख रुपये देणार असल्याचेही तोमर यांनी स्पष्ट केले.
पुण्यातील कोंढवा बुद्रुक परिसरात इमारतीची संरक्षक भिंत कोसळून १७ मजुरांच....
अधिक वाचा