ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

'एक कदम स्वच्छता की ओर' २० मीटर अंतर पार केलं तरच शक्य आहे - सुबोध भावे 

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 04, 2020 07:54 PM 2019-02-12T14:15:30+5:30

'एक कदम स्वच्छता की ओर' २० मीटर अंतर पार केलं तरच शक्य आहे - सुबोध भावे 

शहर : मुंबई

       ‘स्वच्छ भारत अभियान’ 'एक कदम स्वच्छता की ओर’ हे वाक्य आपण नेहमी ऐकत असतो. केंद्र सरकारने देशातील नागरिकांना स्वच्छ पर्यावरण आणि चांगले आरोग्य मिळावे यासाठी ‘स्वच्छ भारत अभियान’ संपूर्ण देशात राबवायला सुरुवात केली. मात्र या अभियानात लोकांचा आवश्यक तितका सहभाग अजून दिसून येत नाही. हे अभियान लोकांनी प्रतिसाद दिल्यास यशस्वी होऊ शकते. 


        सुबोध भावे नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असतो आणि याच अभियानावरून त्यानं सणसणीत टोला देत एक पोस्ट केली आहे. सुबोधने एक फोटो ट्विट केला आहे. या फोटोमध्ये रस्त्यावर फेकलेल्या रिकाम्या पाण्याच्या बाटल्या दिसत आहेत. आश्चर्य म्हणजे जवळच कचरापेटी असतानाही अज्ञाताने पाण्याच्या बाटल्या रस्त्यावरच फेकलेल्या दिसत आहेत.

 
         यावर “जेव्हा आपण हे २० मीटरच अंतर गाठु तेव्हा आपला देश आपोआप बदलेल…आपला देश, स्वच्छ देश” अशा शब्दात सुबोधने आपला संताप व्यक्त केला आहे.सुबोध भावे सोशल मीडियावर सातत्यानं सक्रिय असतो. समाजात घडणाऱ्या घटनांवर तो आपलं मत स्पष्टपणे व्यक्त करत असतो. यावेळी त्याने रस्त्यांवरील अस्वच्छतेबाबत आपले मत मांडले आहे. त्याने केलेले हे ट्विट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

 

मागे

जनगणना काम नाकारल्यास तुरूंगवास 
जनगणना काम नाकारल्यास तुरूंगवास 

       नवी दिल्ली - राज्य सरकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कर्मच....

अधिक वाचा

पुढे  

मुंबईतील कामाठीपुरामध्ये इमारतीला आग
मुंबईतील कामाठीपुरामध्ये इमारतीला आग

          मुंबई - नागपाडा येथील चायना बिल्डिंगला आज सकाळी ९ वाजण्याच्या ....

Read more