By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 27, 2020 11:37 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : नाशिक
लासलगावसह जिल्ह्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये आज कांदा लिलाव बंद करण्यात आला आहे. सलग दुसऱ्या दिवशीही कांदा लिलाव बंद असल्यानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चिंतेनं ग्रासलं आहे. अघोषित कांदा लिलाव बंदीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे. कांदा लिलाव बंदीमुळे बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळत आहे. बाजार समित्यांमध्ये दररोज कोट्यवधींची उलाढाल होत असते. पण कांदा लिलाव बंद झाल्यानं शेतकऱ्यांच्या हालाला पारावर उरलेला नाही. केंद्र शासनाने कांदा साठवणुकीवर निर्बंध आणल्यामुळे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना आक्रमक झाली असून, व्यापाऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडला आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांकडून होणारी 75 टक्के कांदा खरेदी बंद झाली आहे. केंद्र सरकारकडून 25 टन कांदा साठवणुकीची मर्यादा टाकण्यात आली आहे. अधिक कांदा असलेले व्यापारी लिलावात सहभागी झालेले नाहीत. त्यामुळे अनेक बाजारांमध्ये कांद्याचे दर घसरल्याचं चित्र आहे.केंद्र शासनाने कांदा साठवणुकीवर मर्यादा घातल्यामुळे व्यापाऱ्यांनी कांदा खरेदी करण्यास असमर्थता दाखवली आहे. लिलाव बंद असल्याने शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. खरेदी केलेला कांदा पडून असल्याचंही व्यापाऱ्यांनी सांगितलं आहे. लिलावात सहभागी होणार नसल्याचंही व्यापाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. खरंतर, देशातील बर्याच भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे कांदासुद्धा येत्या काळात सर्वसामान्यांच्या डोळ्यांत पाणी आणणार आहे.जर कांद्याचे भाव सध्याच्या गतीने वाढत राहिले तर यंदा दिवाळीत कांद्याचे दर खूपच भडकू शकतात. किरकोळ बाजारात सध्या कांदा 40-50 रुपये किलोनं मिळतोय. देशातील सर्वात मोठा कांदा बाजार असलेल्या नाशिकमधील लासलगाव येथे गेल्या काही दिवसांपूर्वी कांद्याचा भाव प्रति क्विंटल 6802 रुपयांवर पोहोचला होता. कांद्याचा हा सर्वाधिक भाव आहे. येत्या काही दिवसांत किरकोळ बाजारात कांद्याचे दर 100 रुपयांच्या पुढे जाऊ शकतात, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
कांदा महाग का होत आहे?
महाराष्ट्रातील लासलगावात चांगल्या कांद्याचा बाजारभाव दर क्विंटल 6 हजार 802 रुपयांवर पोहोचला. इंग्रजी वृत्तपत्र टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील बर्याच भागात मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे शेतात कांद्याचे पीक नष्ट झाले आहे, त्यामुळे कांद्याचे भाव गगनाला भिडले आहेत.
कांद्याचे दर फेब्रुवारीपर्यंत खाली येणार नाहीत?महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात आणि कर्नाटकमध्ये कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे व्यापा-यांचे म्हणणे आहे. म्हणूनच व्यापा-यांनी होर्डिंगही सुरू केले आहेत. नवीन पीक फेब्रुवारीमध्ये येईल, तोपर्यंत कांद्याचे दर खाली जाण्याची चिन्हे दिसत नाहीत. कांद्याच्या दरात वाढ होण्याचे एक कारण म्हणजे हॉटेल आणि ढाबे सुरू करणे. त्यामुळे कांद्याची मागणीही वाढली असून, कांदा महाग होत आहे.
आरक्षणावर आलेली स्थगिती उठवण्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि विनोद पाटील यां....
अधिक वाचा