ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

सोलापुरात कांद्याला साडेदहा हजारांचा उच्चांकी दर

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 13, 2019 05:02 PM 2019-02-12T14:15:30+5:30

सोलापुरात कांद्याला साडेदहा हजारांचा उच्चांकी दर

शहर : सोलापूर

           सोलापूर- कृषि उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या दरात घसरण सुरू असतानाही कांद्याची आवक सुरूच आहे. २८ हजार ३८४ क्विंटल कांद्याची आवक होऊन त्यात प्रतिक्विंटल दहा हजार पाचशे रुपये इतका उच्चांकी दर मिळाला. तर स्थिर दर तीन हजार रुपये होता. दिवसभरात कांदा खरेदी-विक्री व्यवहारातून आठ कोटी ५१ लाख ५२ हजार रुपयांची उलाढाल झाली.


           दिवसभरात सोलापूर कृषी बाजारात २८३ मालमोटारी भरून ५६ हजार ७६८ पिशव्या म्हणजे २८ हजार ३८४ क्विंटल कांद्याची आवक झाली. यापैकी उच्च व गुणवत्ता असलेल्या सहा क्विंटल कांद्याला उच्चांकी दर मिळाला. तर उर्वरित २८ हजार ३६० क्विंटल कांद्याला प्रतिक्विंटल जेमतेम तीन हजार रुपये सरासरी दर मिळू शकला.


           दरम्यान, कांद्याला किमान दर दोनशे रुपये मिळाला. त्यात १८ क्विंटल निकृष्ट प्रतीचा कांदा खरेदी केला गेला. सोलापूरच्या बाजारात गेल्या दीड महिन्यापासून जुना व साठवणूक केलेल्या कांद्याची आवक होत आहे. नवीन कांदा अद्यापि आलेला नाही. गेल्या ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा फटका कांद्याच्या शेतीला होऊन कांद्याचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात घटले आहे. परिणामी, नवीन कांदा बाजारात येत नसल्याचे चित्र कायम आहे.
 

मागे

अचानक पडलेल्या पावसाने कांदा आणि मक्याचे मोठे नुकसान
अचानक पडलेल्या पावसाने कांदा आणि मक्याचे मोठे नुकसान

            धुळे - कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आलेला कांद....

अधिक वाचा

पुढे  

ऑनलाइन खरेदी करणारे ५६.१% भारतीय सवलतीशी संबंधित फसवणुकीच्या जाळ्यात
ऑनलाइन खरेदी करणारे ५६.१% भारतीय सवलतीशी संबंधित फसवणुकीच्या जाळ्यात

एकावर एक मोफत, एक वस्तू खरेदी करा दुसऱ्यावर ३० टक्के सूट मिळावा... या अशा काही ....

Read more