By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑक्टोबर 01, 2019 12:07 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
कांद्याचे वाढते दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घालण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय रविवारी घेतला होता. त्यानंतर मुंबईत कांद्याचे दर पडले आहेत. घाऊक बाजारात कांदा 38 ते 44 रूपये प्रतिकिलोवरून 32 ते 36 रूपयांपर्यंत आला आहे. तर किरकोळ मार्केटमध्येही कांद्याचे दर 70 रूपयांवरून 50 रूपये प्रतिकिलोपर्यंत खाली आले आहेत.
देशात यंदा कांद्याचे उत्पादन कमी झाले आहे. कांद्याची मागणी वाढत असल्याने आणि मागणीनुसार पुरवठा होत नसल्याने कांद्याचे दर भडकले होते. किरकोळ बाजारात 60 रुपये किलोपर्यंत कांद्याचे दर पोहचले होते. त्यामुळे सर्वसामान्यांच्या डोळ्यात कांद्याने पाणी आणले होते. सर्वसामान्य जनेतच्या हिताचा विचार करत कांदा दर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी आणली.
कांद्याच्या निर्यात बंदीला राजू शेट्टी यांनी विरोध दर्शविला होता. ह्या निर्यात बंदीमुळे शेतकर्यांचे नुकसान होत असले तरी सर्वसामान्य नागरिक मात्र सुखावला आहे.
महाराष्ट्रात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि कौशल्यावर ....
अधिक वाचा