ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

कांदे घेऊन पळणाऱ्या चोरट्यांना अटक

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 16, 2019 02:49 PM 2019-02-12T14:15:30+5:30

कांदे घेऊन पळणाऱ्या चोरट्यांना अटक

शहर : मुंबई

              मुंबई  -  गेल्या काही दिवसांपासून कांद्याचा वांदा हा केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे होतोय. याचा फटका कधी शेतकऱ्यांना तर कधी सामान्य नागरिकांना बसतोय. कांद्याचे भाव गगनाला भिडल्यामुळे कांदा चोरीच्या घटनांमध्येही वाढ झालेली आहे. कल्याणच्या एपीएमसी मार्केटमधील एका दुकानातून तब्बल ११० किलो कांदा चोरीला गेल्याची घटना शनिवारी घडली. इम्रान सय्यद (वय २०), जरिश शेख (१९) अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत.  या प्रकरणी दोन तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे.

             चोरट्यांनीही आपला मोर्चा आता कांदाचोरीकडे वळवला असून दिवसेंदिवस मुंबई आणि परिसरात कांदाचोरीच्या घटना वाढल्या आहेत. कांदा चोरून पळत असतानाच, पोलिसांनी चोरट्यांवर झडप घातली आणि त्यांच्या मुसक्या आवळल्या. हे दोघेही कल्याण पूर्वेकडील पत्री पूल परिसरात राहतात. अमित सर्वगौड (वय ३७) यांचे एपीएमसी मार्केटमध्ये दुकान आहे. त्यांनी दुकानात कांद्याच्या गोणी ठेवल्या होत्या. चोर दुकानातील कांद्याची गोण घेऊन पळत होता. 

              दरम्यान, त्याचवेळी गस्तीवर असलेल्या बाजारपेठ पोलिसांना संशय आला. त्यानंतर त्याला अटक केली. चौकशीत शेख यानंही कांदा चोरला असल्याचं सय्यदनं सांगितलं. अखेर शेखलाही अटक करून कांद्याची गोण हस्तगत केली. दोन गोण्यांमध्ये ११० किलो कांदा होता. बाजारात त्याची किंमत सात हजार रुपये होती, अशी माहिती सर्वगौड यांनी दिली. 

मागे

दारूचे व्यसन सोडवण्यासाठी बेवड्याची पोलिस कस्टडीत राहण्याची तयारी
दारूचे व्यसन सोडवण्यासाठी बेवड्याची पोलिस कस्टडीत राहण्याची तयारी

दारुचं व्यसन सोडवण्यासाठी एका व्यक्तीनं चक्क पोलिसांनाच स्वत:हून १०० नंबर....

अधिक वाचा

पुढे  

पाकिस्तानच्या गोळीबारात गडहिंग्लज तालुक्यातील महागावचे ज्योतिबा चौघुले शहीद
पाकिस्तानच्या गोळीबारात गडहिंग्लज तालुक्यातील महागावचे ज्योतिबा चौघुले शहीद

रविवारी रात्री पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात कोल्हापूर जिल्ह्....

Read more