ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

कांदा आणखी काही दिवस ग्राहकांना रडवणार

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 26, 2019 04:12 PM 2019-02-12T14:15:30+5:30

कांदा आणखी काही दिवस ग्राहकांना रडवणार

शहर : मुंबई

          पुणे - कांद्याचे वाढलेले दर आणखी काही दिवस वधारलेलेच असणार आहेत. भारतात कांद्याची आयात वाढल्यामुळे जागतिक स्तरावरही कांद्यांच्या किंमतीत वाढ झाली आहे. त्याच्या परिणामी, तुर्कीने कांद्याच्या निर्यातीवर बंदी आणली आहे. तर, श्रीलंकेतून येणाऱ्या कांद्याच्या पुरवठ्यात घट झाली आहे. त्यामुळे कांद्यांच्या महागाईची झळ सर्वसामन्यांना आणखी काही काळ सोसावी लागणार आहे.


          सध्या बाजारात चांगल्या प्रतिच्या कांद्याची किंमत १०० ते १५० रुपये प्रतिकिलोपर्यंत आहे. कृषी बाजार उत्पन्न समितीत आणि बाजारात कांद्याची आवक वाढत आहे. सध्या बाजारात उपलब्ध असलेला कांदा हा मागील वर्षीच्या तुलनेत फक्त ५० टक्के आहे. आशियातील कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगावमध्ये मागील दोन दिवसांत कांद्याची आवक वाढली आहे. सध्या लासलगाव बाजारात १३ हजार क्विंटल कांद्याची आवक झाली आहे.


          तर, मागील वर्षी याच काळात २५ हजार ते २७ हजार क्विंटल आवक होती. श्रीलंकेने कांद्याच्या निर्यातीबाबत काही नियमांचे कठोर पालन करणे सुरू केले आहे. त्यामुळे तिथून येणाऱ्या कांद्यात घट झाली असल्याचे व्यापारी अजित शाह यांनी सांगितले. तर, तुर्कीनेदेखील तीन दिवसांपूर्वीच कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. तर, इजिप्त आणि अफगाणिस्तानच्या बाजारपेठेत भारतासाठी मुबलक कांदा उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.


        मागील काही दिवसांपूर्वी असलेल्या कांद्याच्या किंमतीत सध्या काहीशी घट झाली असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. आगामी काही दिवसांत आयात कांद्याची आवश्यकता कमी होण्याची शक्यता आहे. आयात झालेल्या कांद्याची किंमत ५५ रुपये किलो आहे. तर, बाजारात हा कांदा ६५ रुपये प्रतिकिलो दराने विकला जात असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. भारतात वाघा बॉर्डरद्वारे अफगाणिस्तानमधील कांदा दाखल होत आहे.
 

मागे

मुंबईकरांना नवीन वर्षातही मोठ्या वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागणार
मुंबईकरांना नवीन वर्षातही मोठ्या वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागणार

        मुंबई - मुंबईकरांना २०२० या नवीन वर्षात मोठ्या वाहतूक कोंडीला स....

अधिक वाचा

पुढे  

एस. टी. सवलतीसाठी गोलमाल केलेली २५ आधारकार्ड जप्त
एस. टी. सवलतीसाठी गोलमाल केलेली २५ आधारकार्ड जप्त

          राज्य परिवहन महामंडळाने ज्येष्ठ नागरिकांना ‘स्मार्ट कार्ड&r....

Read more