By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 15, 2020 12:58 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबईकरांना आपल्या जवळचे नैसर्गिक तसंच कृत्रिम विसर्जन स्थळही निवडता येणार आहे. त्यासाठी मुंबई महानगरपालिकेने बुकिंगची व्यवस्था केली आहे. मात्र, हे बुकिंग ऑनलाईन पद्धतीने करावे लागणार आहे. याबाबत महापालिकेने व्यवस्था केली आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे पालिकेने हे नियोजन केले आहे.
कोरोना संकटामुळं विसर्जन स्थळांवर गर्दी टाळण्यासाठी मुंबई महापालिकेनं लाँच केली आहे. वेबसाईट मुंबईकरांना गणेश विसर्जनाला जाण्यापूर्वी विसर्जन स्थळ, दिनांक आणि वेळ ऑनलाईन बुकींग करावी लागणार आहे. गणेश मंडळांना तसेच घरगुती गणपती असणा-यांनाही करावं लागणार बुकींग
shreeganeshvisarjan.com या संकेतस्थळावर गणेशविसर्जनसाठीची तारीख बुकिंग करण्याची सोय उपलब्ध करण्यात आली आहे. विसर्जनस्थळाचा आकार लक्षात घेवून सोशल डिस्टन्सिंग ठेवण्याच्या दृष्टीने गणेशभक्तांची ठराविक संख्या निश्चित करण्यात आली आहे. प्रत्येकी अर्ध्या तासांचे स्लॉट करण्यात आले असून या अर्धा तासात बुकिंग करण्यात आलेल्या गणेशभक्तांना विसर्जनस्थळी सोडले जाणार
बुकिंग केल्यावर असा मेसेज येणार
गणेशविसर्जनच्या या नव्या सुविधेमुळे मुंबईकरांना आपल्या जवळचे नैसर्गिक तसेच कृत्रिम विसर्जन स्थळही निवडता येणार आहे. तसेच यामुळे पोलिसांना गर्दीवर नियंत्रण मिळवणे शक्य होणार आहे. आणि कोविड-१९ प्रतिबंधासही मदत होईल, असे मुंबई महापालिकेच्यावतीने सांगण्यात आले आहे.
राम जन्मभूमी अयोध्येतील राम मंदिरात्या बहुप्रतिक्षित भूमीपूजनानंतर साधा....
अधिक वाचा