By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 13, 2020 10:49 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : पुणे
कोरोनाच्या काळात शाळा बंद करण्यात आलेल्या असून, शाळांनी पालकांकडे फीचा तगादा लावला आहे. पुण्यात फी न भरल्यास ऑनलाईन शिक्षण बंद केलं जाणार आहे. यासंदर्भात पालिकेच्या शिक्षण मंडळात दुपारपासून सुनावणी सुरू आहे. शिक्षण संचालकांसमोर पालकांनी शाळांविरोधातल्या तक्रारींचा पाढा वाचला. पालकांनी फी कमी करण्याची मागणी केली असून, शाळा 100 टक्के फी वसुलीवर ठाम असल्याचंही समोर आलं आहे. त्यामुळे हा वाद निर्माण झाला आहे. शिक्षण संचालकांच्या सुनावणीत पालक आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत.
दुसरीकडे पुणे महानगरपालिकेतील सर्व शाळा 3 जानेवारीपर्यंत बंद राहणार आहेत. पुणे महापालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती दिली आहे. कोरोना संसर्ग आणि पालकांचा हमीपत्राला मिळालेला अत्यल्प प्रतिसाद या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय. पिंपरी-चिंचवडमध्येही 3 जानेवारीपर्यंत शाळा बंदच राहणार आहेत. तिथल्या महापालिका प्रशासनाचा हा निर्णय आहे.
राज्यभरात फी वसुलीवरून पालक आक्रमक असल्याचं अनेकदा निदर्शनास आलं आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईतल्या दहिसर पूर्व येथील रतन नगर सेंट झेवियर्स हायस्कूल येथील प्रशासन शुल्क वसुलीसाठी पालकांवर आणि विद्यार्थ्यांवर जबरदस्ती, मनमानी करत आहे. शाळा बंद असताना टर्म फी आणि लॅब फी, कॉम्प्युटर फी, लायब्ररी फी भरण्यासाठी तगादा लावला जात होता, तेव्हा शाळेवर मनसे सरचिटणीस नयन कदम यांच्या नेतृत्वाखाली धडक मोर्चा नेण्यात आला होता.
पोलिसांच्या समोर मनसे सरचिटणीस नयन कदम आणि सोबत विभाग अध्यक्ष विलास मोरे, दिनेश साळवी आणि पालकांचे काही प्रतिनिधी यांनी एकत्रित येऊन सेंट झेव्हियर रतन नगर दहिसर पूर्व यांच्या प्रशासनाशी संवाद साधून पालकांना होणाऱ्या त्रासाबद्दल चर्चा केली होती, तत्पूर्वी विभाग अध्यक्ष राजेश येरुणकर यांनी पत्रव्यवहार करून या विषयाला वाचा फोडली होती.
शाळा प्रशासनाने सकारात्मक उत्तरे देत कोर्टाचा निर्णय जोपर्यंत येत नाही, तोपर्यंत ट्युशन शुल्क सोडून इतर कोणतेही शुल्क भरण्यासाठी शाळा प्रशासनाकडून सक्ती करण्यात येणार नाही, असं सांगितलं. तसेच कोणतेही शुल्क न भरल्यामुळे पाल्यांना ऑनलाइन शिक्षणातून वगळण्यात येणार नाही, अशी ग्वाही दिली आणि पालकांच्या इतर मागण्या बद्दलही चर्चा करून सकारात्मक उत्तरे दिली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5 ऑगस्ट रोजी अयोध्येतील राम मंदिराचे ....
अधिक वाचा