By SEJAL PURWAR | प्रकाशित: ऑगस्ट 30, 2019 01:20 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : hyderabad
आंध्रप्रदेशात स्थित असलेल्या व सर्वात श्रीमंत मंदिर म्हणून फक्त भारतात नव्हे तर संपूर्ण जगात नावाजलेल्या हिंदूंचे सर्वोत्कृष्ट असे देवस्थान तिरुपती बालाजी येथे आता फक्त हिंदू कर्मचारीच कार्य करू शकतील , असा निर्णय आंध्रप्रदेश सरकारने घेतला आहे .
तिरूपती हे भारतातील सर्वात प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांमध्ये मोडले जाणारे देवस्थान आहे .तिरू म्हणजे लक्ष्मी. लक्ष्मीचा पती म्हणजे तिरूपती म्हणजेच विष्णु असा अर्थ घेता हे डोंगरावर स्थित भव्य मंदिर आहे . बालाजी विष्णूचा अवतार मानला जात असल्याने अनेक लोक येथे दर्शनासाठी येत असतात.
त्यामुळे आंध्रचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी तिरुपती देवस्थानात आता एकही बिगरहिंदू कर्मचारी कार्यरत राहणार नाही, असे जाहीर केले आहे. हा निर्णय हिंदू समाजासाठी महत्वाचा वाटत असून याकडे ऐतिहासिक दृष्टीकोणातून बघितले जात आहे .हिंदूंची श्रद्धा व भावना दुखावली जाऊ नये म्हणून आंध्र सरकारने हा निर्णय घेतल्याचे जाहीर केले आहे .
तिरूपती मंदिरातून मिळालेल्या माहितीनुसार सध्या मंदिरात 44 बिगरहिंदू कर्मचारी कार्यरत आहेत. परंतु यापुढे फक्त ज्या बिगरहिंदू कर्मचार्यांनी हिंदुधर्मात प्रवेश केलेला आहे व हिंदू धर्म स्वीकारला आहे ,त्याच कर्मचार्यांना देवस्थानात कार्य करण्याची अनुमती देण्यात येणार, अन्यथा बाकी बिगरहिंदू कर्मचार्यांना कमी करण्यात येईल अशी माहिती मिळत आहे.
उर्वरित बिगरहिंदू कर्मचारीदेखील हिंदू धर्मात प्रवेश करू इच्छित असतील, अशाच कर्मचार्यांना पुढे देखील मंदिरात काम करता येण्याची परवानगी मिळेल, अन्यथा पुढे बिगरहिंदू कर्मचार्यांना कार्य करता येणार नाही. हा हिंदू भाविकांच्या भावना दुखावल्या जाण्याचा मुद्दा असल्याने हा केवळ सध्या पूरता मर्यादित नाही तर प्रत्येक कर्मचार्याची तपासणी होणार असे आंध्रचे सचिव सुब्रमण्यम स्वामी यांनी स्पष्ट केले आहे .
आंध्र प्रदेशात जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआर कॉंग्रेस ची सत्ता आल्याने भाजपचाही सरकारला पाठिंबा असल्याचे दिसून येते. गेल्या काही दिवसांपासून जगनमोहन रेड्डी व भाजप आंध्रप्रदेशमध्ये अँटी हिंदू एजेंडा राबवत असल्याचे दिसून येत आहे .याचवेळी बिगरहिंदू कार्यकर्त्यांना कमी करण्याचा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे .
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्या भक्तांकरिता कोकण रेल्वे मार्गावर खास गा....
अधिक वाचा