By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 28, 2020 10:16 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
कोरोना व्हायरसचा Coronavirus वाढता प्रादुर्भाव पाहता या पार्श्वभूमीवर आता आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मागील काही दिवसांमध्ये नागरिकांची मागणी आणि Unlock अनलॉकच्या टप्प्याअंतर्गत Mumbai Local मुंबई लोकलमधून महिलांना प्रवास करण्याची मुभा देण्यात आली होती. पण, या प्रवासादरम्यान गर्दी झालीच शिवाय अनेक महिला लहान मुलांना घेऊन प्रवास करत असल्याची बाबही समोर आली. परिणामी कोरोनाचा एकंदर संसर्ग आणि संभाव्य धोका पाहता याच धर्तीवर महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबई लोकलमधून यापुढं महिलांना प्रवास करता येईल, पण लहान मुलांना घेऊन प्रवास करणाऱ्या महिलांना मात्र प्रवेश नाकारण्यात येणार आहे. थोडक्यात लहान मुलांना लोकल प्रवासाची परवानगी नाकारण्यात आली आहे. रेल्वे प्रशासनानंच याबाबतची माहिती दिली आहे.
प्रशासनाच्या आदेशांचं पालन केलं जाण्यासाठी सर्व रेल्वे स्थानकांवर रेल्वे पोलीस तैनात असणार आहेत. जे परिस्थितीवर नजर ठेवून असतील. कोणाही महिला प्रशासाहल लहान मुल असल्याचं निदर्शनास आल्याच त्या महिलेला प्रवासाची परवानगी नाकारण्यात येईल.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून बऱ्याच अंशी रेल्वे प्रवासाचे नियम बदलण्याच आले असून, ठराविक वेळांमध्ये अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना रेल्वे प्रवासास अनुमती देण्यात आली आहे. शिवाय महिलांनाही लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. दिवाळीनंतर मुंबईत वाढणारा कोरोना रुग्णांचा आलेख पाहता इथं सर्वांसाठीच रेल्वे प्रवास पुन्हा सुरु करण्यास विलंब लागत आहे. नागरिकांनी बेजबाबदारपणे वागत नियमांचं उल्लंघ करण्याचं सत्र सुरुच ठेवल्यास या सेवा पूर्ववत येण्यास आणखी काही कालावधी लागण्याचं चित्र आहे.
पंढरपूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचं शुक्रवारी (27 नोव....
अधिक वाचा