By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 07, 2019 05:07 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : पुणे
भाटघर धरणातून सातत्याने होणार्या विसर्गामुळे धरणातील पाणी झपाट्याने कमी होत आहे. पाणी कमी झाल्यामुळे कांबरे (ता.भोर) येथे भाटघर धरणात गेलेले कांबरेश्वराचे मंदीर बाहेर आले आहे. प्राचीन असलेले हे मंदीर पाहण्यासाठी आजुबाजुच्या गावातील नागरीक या ठिकाणी येत आहेत. भोरपासुन सुमारे 35 किलोमीटर अंतरावर कांबरे गावातील धरणाच्या पात्रात कांबरेश्वराचे मंदीर आहे. हे मंदीर 10 महिने पाण्यात असते. धरणातील पाणी कमी झाल्याने मंदीर पाण्याबाहेर आले आहे. वेळवंड नदीमध्ये प्रचिन असे पांडव कालीन शिवमंदीर आहे. या मंदीराचे मुळ नाव कर्मगरेश्वर आहे. परंतु हे मंदीर कांबरे गावाच्या हद्दीत असल्यामुळे कांबरेश्वर नावाने ओळखले जाते. या मंदीराचे वैशिष्टये म्हणजे पांडवकालीन असुन ते पांडवांनी बांधले आहे, अशी आख्यायिका आहे. मे व जुन दोन महिनेच हे मंदीर पाण्याबाहेर असते. पुर्वी धरण नव्हते त्यावेळी मंदीराच्या जागेवर शेती होती. दरवर्षी, पडणार्या पावसामुळे धरणात पाण्याबरोबर वाहात असलेल्या गाळामुळे मंदीर जमिनीखाली गेले आहे. मात्र मंदिराचा पाया आणि त्यावरील बांधकाम असुनही भक्कम आहे. धरणातील पाण्याच्या लाटांमुळे थोडी फार मोडतोड झाली आहे. मंदीरात स्वयंभु शिवलिंग असुन तसेच पार्वती मातेची मूर्ती व नंदी आहे.
पुर्वी मंदिरात जाताना वर चढुन जावे लागत होते. मात्र, गाळामुळे मंदिराच्या पायर्या गाडल्या गेल्या आहेत. मंदीरासमोर नंदी असलेला चौथरा आहे. मंदिराच्या कळसाचे व वरील बाजुचे बांधकाम चुनखडक वाळु आणि भाजलेल्या विटात आहे. तर मंदिराच्या भीतीचे बांधकाम दगडात केलेले आहे. मात्र, दगड साधेसुधे नसुन 20 मजुरांना देखील एकत्र येऊन उचलता येणार नाहीत. इतके मोठे दगड आहेत. पांडवांनी त्या काळात कुशल कलाकृतीचा वापर करुन आयातकृती दगड एकावर एक बसवुन मंदीराची रचना केली आहे.
12 हून अधिक तास कराव्या लागणार्या कामाला ब्रेक लावत पोलीस अंमलदारांच्या स....
अधिक वाचा