By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 03, 2019 01:00 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
पेटीएम ई-वॉलेट कंपनी ग्राहकांसाठी नवीन सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे. ही सेवा पेटीएम कंपनी द्वारे पहिल्यांदाच सुरू करण्यात येणार आहे. याबाबत कंपनीने एका बॉग पोस्टच्या माध्यमातून माहिती दिली आहे. जर तुम्ही या कंपनीचा भाग असाल तर तुमच्या साठी एक सुवर्ण संधी आहे. तुम्हाला या सेवे मार्फत घर बसल्या पैसे कमवता येणार आहे. नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी पेटीएमकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या ब्लॉग पोस्टमध्ये 2019-20 साली पेटीएम कंपनीला मान्यता मिळाली आहे. या मान्यते अंतर्गत तुम्ही पेटीएमच्या माध्यमातून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू शकता.
पेटीएम ई-वॉलेट कंपनीला 1 एप्रिल रोजी मान्याता देण्यात आली आहे. आतापर्यंत अनेक स्टॉक ब्रोकिंग कंपन्या बाजारात काम करीत आहेत. शेयर बाजार नियामक सेवी कंपनीने पेटीएमची उपकंपनी असलेल्या पेटीएम मनीला मंजुरी दिली आहे. लवकरच तुम्ही पेटीएमच्या अॅपवरून शेयर खरेदी आणि विक्री करू शकता. यापूर्वी पेटीएमच्या माध्यमातून म्युच्युअल फंड सेवा सुरू करण्यात आली होती.
कपनीकडून माहिती मिळाली आहे की, बीएसई आणि एनएसईसाठी ब्रोकर मेंबरशिप मिळाली आहे. आता कंपनी लवकरच स्टॉक एक्स्चेंजसह गुंतवणूक आणि ट्रेडिंग उत्पादने सुरू करेल. पेटीएम मनीच्या प्लॅटफॉर्मवर इक्विटी आणि कॅश सेगमेंट लवकरच सुरू होणार आहे. तथापि, या संदर्भात अद्याप कोणताही कालावधी निश्चित करण्यात आलेला नाही. येणाऱ्या काही महिन्यात कोट्यावधी भारतीय पेटीएम मनीच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे बचत करू शकतात.
पेटीएमने आपल्या नव्या सेवेसाठी 24 म्युच्युअल सेवा देणाऱ्या कंपन्यासह हातमिळवणी केली आहे. सध्या बँकांमध्ये मुदत ठेवींवर 7 ते 9 टक्के परतावा मिळतो. तर म्युच्युअल फंडांना 15 टक्क्यांपर्यंत वार्षिक परतावा मिळतो. म्युच्युअल फंडांमधील गुंतवणूकीदेखील धोकादायक असू शकते आणि परतावा शेअर बाजाराच्या हालचालीवर अवलंबून असतो.
अमेरिकेने २.४ अब्ज डॉलर्सला भारताला २४ 'एचएच ६० 'रोमियो' सी हॉक' हेलिकॉप....
अधिक वाचा