ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मुंबईतून हजारो चाकरमानी कोकणात, सरकारने सोय न केल्याने ई-पासमध्ये भ्रष्टाचार, विरोधकांचा आरोप

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 04, 2020 12:22 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मुंबईतून हजारो चाकरमानी कोकणात, सरकारने सोय न केल्याने ई-पासमध्ये भ्रष्टाचार, विरोधकांचा आरोप

शहर : रत्नागिरी

कोकणात निघालेल्या चाकरमान्यांची सरकारनं सोय केल्यानं चाकरमानी गणेशोत्सवासाठी -पास काढून जात आहेत. मात्र त्या -पासमध्ये भ्रष्टाचाराचा आरोप होतो आहे. तर उत्तर भारतीयांना बस आणि ट्रेन, मग कोकणावासियांना का नाही?, असा सवाल विरोधकांनी केला आहे.

अनेक चाकरमानी हे गणेशोत्सवासाठी मुंबईहून कोकणाकडे निघाले आहे. मात्र शिवसेनेचे खासदार विनायक राऊतांच्या आवाहनावर भाजप आणि मनसेनं आक्षेप घेतला आहे. गणेशोत्सवासाठी आवश्यकता आहे त्यांनीच यावं, बाकीच्यांनी येऊ नये असं विनायक राऊत म्हणाले आहेत.

यावरुनच आता भाजपनं सवाल उपस्थित केला आहे. कोकणवासियांचा एवढा राग का? असा शब्दात भाजप नेते आशिष शेलारांनी शिवसेनेवर टीका केले आहेत.

एसटी बसद्वारे चाकरमान्यांना कोकणात आणू, असं परिवहन मंत्री अनिल परब वारंवार म्हणाले आहेत. मात्र चाकरमान्यांसाठी तशी सोय काही झाली नाही. त्यामुळे -पास काढून चाकरमानी कोकणात येत आहेत. मात्र -पासमध्येही भ्रष्टाचार होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.तर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर चाकरमान्यांच्या हातावर क्वॉंरटाईनचा शिक्का मारुन प्रवेश दिला जात आहे. चाकरमान्यामुळं कोरोनाचा फैलाव होऊ नये, म्हणून 14 दिवस क्वॉरंटाईनची अट ग्रामपंचायतींनी ठेवली आहे. त्यामुळं गावातील शाळांमध्ये या चाकरमान्यांना विलगीकरणात ठेवण्यात येतं आहे.

पुढील 14 दिवसांचा क्वारंटाईन कालावधी लक्षात घेऊन हजारो चाकरमानी कोकणात दाखल होत आहेत. त्यामुळे पासमधून लूट होणार नाही, एवढी काळजी सरकारने घेतली पाहिजे, असे अनेकांचे म्हणणं आहे.

मागे

मुंबईत सरसकट दुकानं सुरु कण्यास परवानगी, दारु दुकानांना काऊंटरवर विक्रीला मुभा
मुंबईत सरसकट दुकानं सुरु कण्यास परवानगी, दारु दुकानांना काऊंटरवर विक्रीला मुभा

मिशन बिगीन अंतर्गत मुंबईत आता सरसकट दुकानं सुरु कण्याची परवानगी मुंबई महाप....

अधिक वाचा

पुढे  

राज्यात सलग तिसऱ्या दिवशी नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक
राज्यात सलग तिसऱ्या दिवशी नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक

राज्यात सलग तिसऱ्या दिवशी नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्य....

Read more