By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: जुलै 01, 2019 05:04 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
नगरसेवकांकडे 50 लाख रुपयांची लाच मागणार्या जात पडताळणी समितीच्या तीन अधिकार्यांना निलंबित करण्याचे निर्देश सभापती रामराजे निंबाळकर यानी दिले होते. मात्र वर्ष उलटल तरी सभापतींच्या निर्देशाचे पालन केले गेले नाही. याकडे अधिवेशनात अनिल परब यांनी हा मुद्दा पुन्हा उपस्थित करताच सभापती निंबाळकर यांनी त्या तीन अधिकार्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निलंबित करावे असे आदेश दिले.
गेल्या वर्षी म्हणजेच 2018 मध्ये पावसाळी अधिवेशनातच जात पडताळणी समितीच्या अधिकार्यानी नगरसेवकांकडे 50 लाख रुपयांची लाच मागितल्याच्या प्रकरणाचा गौप्यस्फोट अनिल परब यांनी केला होता. त्यावेळी सभापतींनी संबंधित तीन अधिकार्यांना निलंबित करण्याचे निर्देश दिले होते. तथापि वर्ष झाले तरी त्या अधिकार्यांवर कारवाई झाली नाही. याकडे लक्ष वेधून घेतानाच संबंधित अधिकारी म्यात मध्ये जातील या भीतीने कारवाई केली जात नाही का? असा मुद्दा उपस्थित केला त्यावर सभापतींनी त्या अधिकार्याना निलंबित करण्याचे आदेश दिले.
येत्या 48 तासात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त के....
अधिक वाचा