ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणाच्या तपासासाठी SIT ची स्थापना, आठ दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: सप्टेंबर 30, 2020 06:05 PM 2019-02-12T14:15:30+5:30

हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणाच्या तपासासाठी SIT ची स्थापना, आठ दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश

शहर : मुंबई

हाथरस येथील सामूहिक बलात्कार प्रकरणाची चौकशी करण्यासाठी ची स्थापना करण्यात आली आहे. या पथकाला बलात्कार प्रकरणाचा तपास करुन, आठ दिवसात अहवाल सादर करावा लागणार आहे. तसे आदेश उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत.

हाथर सयेथील बलात्कार पीडित तरुणीचा मृत्यू झाल्यानंतर देशभरात असंतोष निर्माण झाला. बलात्कार प्रकरणानंतर उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ यांच्या सरकारवर टीका होत असून त्यांच्या राजीनाम्याची मागणीही होत आहे. नागरिकांमधील असंतोष आणि बलात्कार प्रकरणाचे गांभीर्य ओळखून आता योगी आदित्यनाथ यांनी SIT स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. या पथकाला बलात्कार प्रकरणाचा पूर्ण तपास करुन आपला अहवाल 7 दिवसांच्या आत सादर करावा लागणार आहे. तसे आदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत.

उत्तर प्रदेशचे गृह सचिव भगवान स्वरुप यांच्या अध्यक्षतेखाली SIT ची स्थापना करण्यात आली आहे. या पथकात डीआयजी चंद्रप्रकाश आणि आयपीएस पूनम यांच्यासह एकूण तीन सदस्य असतील. या पथकाला आपला अहवास सात दिवसांच्या सादर करण्याचे आदेश आहेत. तशी माहिती योगी आदित्यनाथ यांनी आपल्या ट्विटमध्ये दिली आहे. तसेच हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. कुठलीही दया करता बाजू प्रभावीपणे मांडण्याचेही आश्वासन त्यांनी दिले आहे.

दरम्यान, पीडित तरुणीवर मंगळवारी (29 सप्टेंबरला) रात्री उशीरा अंत्यसंस्कार करण्यात आले.कुटुंबियांनी तरुणीच्या अंत्यसंस्काराला विरोध केला होता. आमच्या इच्छेविरुद्ध पोलिसांनी अंत्यसंस्कार केल्याचा आरोपही पीडितेच्या कुटुंबियांनी केला आहे. तर, पीडितेच्या कुटुंबीयांचे आरोप फेटाळून लावले आहेत. कुटुंबियांच्या परवानगीनंतरच पीडितेवर अंत्यसंस्कार केले असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

मागे

28 वर्षांच्या बाबरी खटला निकालानंतर निवृत्त, न्यायमूर्ती सुरेंद्र कुमार यादव यांची कारकीर्द
28 वर्षांच्या बाबरी खटला निकालानंतर निवृत्त, न्यायमूर्ती सुरेंद्र कुमार यादव यांची कारकीर्द

बाबरी विद्ध्वंस प्रकरणाचा (Babri Demolition Case) निकाल देणारे सीबीआयच्या विशेष न्यायाल....

अधिक वाचा

पुढे  

स्मृती इराणी गप्प का? नेटकऱ्यांची इराणींवर टीकेची झोड, राजीनामा देण्याची मागणी
स्मृती इराणी गप्प का? नेटकऱ्यांची इराणींवर टीकेची झोड, राजीनामा देण्याची मागणी

हाथरस येथील बलात्कार पीडितेच्या मृत्यूनंतर, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (....

Read more