By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 16, 2021 12:16 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव (Outbreak of coronavirus) पुन्हा वाढू लागल्याने अकोला जिल्ह्यात ( Akola district) पुन्हा कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. शाळा, महाविद्यालय, शिकवण्या बंद करण्यात आल्या आहेत. धार्मिक, राजकीय कार्यक्रमांनाही बंदी घालण्यात आली आहे. तर लग्न समारंभात केवळ 50 व्यक्तींना परवानगी देण्यात आली आहे.
कोरोनाच्या (coronavirus) रुग्ण संख्येत विदर्भात झपाट्याने वाढ होत आहे. त्यात अकोला, अमरावती, यवतमाळ या शहराचा समावेश आहे. अकोल्यात गेल्या आठवडाभरात पाचशेच्यावर रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे अकोलेकरांची चिंता वाढली आहे.
कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी काही नवीन नियमावली तयार करण्यात आली आहे. ही नियमावली 28 फेब्रुवारी पर्यंत राहणार आहे. अकोल्यात जमावबंदी, धार्मिक, राजकीय कार्यक्रमांना बंदी करण्यात आलीय. पाचवी ते नववी पर्यंतच्या शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. तसंच कॉलेजेस बंद ठेवण्य़ात य़ेणार आहेत. शिकवण्या, वर्ग बंद करण्यात आलेत. लग्न समारंभात 50 व्यक्तिंनाच परवानगी देण्यात आली आहे.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला अटकाव घालण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांच्या कडक अंमलबजावणीसाठी संयुक्त पथके गठीत करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये मास्कचा वापर, व्यक्ति व्यक्तिंमधील परस्पर अंतर राखणे व सॅनिटायझर वा हात धुणे या बाबींचा अवलंब करणे आवश्यक असणार आहे.
१) लग्न समारंभात 50 लोकांपेक्षा अधिक जमता येणार नाही..
२) हॉटेल्स , रेस्टॉरंटमध्ये मास्क , सॅनिटायझर चा वापर बांधनकारक राहील.
३) इयत्ता 5 वी ते 9 वी पर्यंतची शाळा बंद..
४) महाविद्यालये सुद्धा बंद ठेवण्यात आली आहे..
५) मास्क आणि सामाजिक अंतर न ठेवणाऱ्या प्रतिष्ठानवर सुद्धा दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहेय..
६) लग्न समारंभासाठी रात्री 10 ची वेळ मर्यादित करण्यात आली आहेय..
७) ग्रामीण तथा शहरी भागात 5 जणांचा वर एकत्रित येता येणार नाही..
८) धार्मिक स्वरुपाच्या यात्रा, उत्सव, समारंभ, महोत्सव, स्नेहसंमेलने, सामूहिक कार्यक्रम, सभा, बैठका यासाठी केवळ 50 व्यक्तिंनाच परवानगी असेल.
९ ) मिरवणूक व रॅली काढण्यासही प्रतिबंध करण्यात आला आहे.
नागपूर पालिकेची कारवाई
नागपुरात कोरोनाचा प्रादुरर्भाव एकीकडे वाढत असताना त्याबाबतच्या नियमांचा विसर पडल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे नियमांचे पालन न करणाऱ्यांविरुद्ध महापालिकेने कारवाई अजून तीव्र केली आहे. निर्धारित संख्येपेक्षा अधिक व-हाडी आढळून आल्याने काल महापालिकेनं विवाह सोहळा असलेल्या परिवारासह मंगल कार्यालयालाही दंड ठोठावला आहे.
नागपूर महानगपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने नरेंद्रनगर येथील तुकाराम सभागृहात झालेल्या लग्न समारंभात निर्धारित संख्येपेक्षा जास्त संख्या लोक असल्याने दहा हजार रुपयांचा दंड वसूल केला धंतोली झोनच्या उपद्रव शोध पथकानं ही कारवाई केलीय. तुकाराम सभागृहाचे संचालक व ज्यांच्याकडचे लग्न समारंभ होते त्यांच्याकडून प्रत्येकी 5 हजार रुपये दंड वसूल केला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव (Coronavirus,) वाढत असून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. विदर्भा....
अधिक वाचा