ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

व्हॉट्स अॅपवर २४ तासांत १०० अब्ज मॅसेजेसचा पाऊस

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 03, 2020 07:06 PM 2019-02-12T14:15:30+5:30

व्हॉट्स अॅपवर २४ तासांत १०० अब्ज मॅसेजेसचा पाऊस

शहर : मुंबई

         नवी दिल्ली - सण, उत्सव, वाढदिवस, नवीन वर्षानिमित्त शुभेच्छा देण्याची पद्धत काहीशी बदलत चालली आहे. व्हॉट्स अॅपवर शुभेच्छांवर पाऊस पडत असतो. या वर्षी मात्र, नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला आणि नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसांत व्हॉट्सअॅपवर मेसेजचा पाऊस नव्हे तर महापूरच आला. जगभरात व्हॉट्सअॅपवर नवीन वर्षाच्या शुभेच्छा देणारे सुमारे १०० अब्ज मेसेज पाठवण्यात आले.


            नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येपासून ते मध्यरात्रीपर्यंत अशा २४ तासांच्या काळात जवळपास १०० अब्ज मेसेज जगभरात पाठवण्यात आले होते. फक्त भारतातच ३१ डिसेंबर रोजी युजर्सने २० अब्जाहून अधिक मेसेज व्हॉट्सअॅपवर पाठवले आहेत. व्हॉट्सअॅपने दिलेल्या माहितीनुसार, जगभरात १०० अब्ज मेसेज पाठवण्यात आले. त्यामध्ये १२ अब्ज फक्त फोटो असलेल्या शुभेच्छा होत्या. 


           व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून मेसेज पाठवणारा आणि स्वीकारणाराच वाचू शकत असल्याचे व्हॉट्सअॅपने स्पष्ट केले आहे. ३१ डिसेंबर रोजी पाठवण्यात आलेल्या मेसेज हे नवीन वर्षाच्या शुभेच्छा देणारे असतील असं व्हॉट्सअॅपने म्हटले आहे. वर्षभरात व्हॉट्स अॅपवर टेक्सट मेसेज, स्टेट्स, पिक्चर मेसेज, कॉलिंग आणि व्हॉइस नोट्स या फिचर्सचा सर्वाधिक वापर झाला असल्याचे कंपनीने म्हटले आहे.


         दरम्यान, ३१ डिसेंबर २०१९ नंतर विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमवर चालणाऱ्या मोबाइलमधून व्हॉट्सअॅप बंद करण्यात आले आहे. त्याशिवाय, काही अॅण्ड्राइड आणि आयओएस प्रणालीवर चालणाऱ्या काही मोबाइलवर एक फेब्रुवारी २०२० नंतर व्हॉट्सअॅप कार्यरत राहणार नाही.
 

मागे

रेमो डिसूझाच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल
रेमो डिसूझाच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

           गाजियाबाद  -  रेमो डिसूझा हा नृत्य कलाकार असून तो बॉलीव....

अधिक वाचा

पुढे  

चक्क ४ वर्षाच्या ‘सह्याद्री’ने सर केला ३ हजार फूट उंच लिंगाणा सुळका
चक्क ४ वर्षाच्या ‘सह्याद्री’ने सर केला ३ हजार फूट उंच लिंगाणा सुळका

          पुणे- गड किल्ल्यांचे संवर्धन आणि रक्षण करण्याचा संदेश घेऊन सम....

Read more