ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

२४ तासांत १०० पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 24, 2019 06:09 PM 2019-02-12T14:15:30+5:30

२४ तासांत १०० पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा

शहर : विदेश

             अफगाणिस्तान - दहशतवाद्यांविरोधात जबरदस्त कारवाई करण्यात आली आहे. साधारणपणे अवघ्या २४ तासांत अफगाणिस्तानच्या सैनिकांनी १०० पेक्षा अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. जवानांकडून दहशतवाद्यांविरोधात राबवण्यात आलेल्या विविध अभियानात या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला असून अन्य ४५ दहशतवादी जखमी झाले आहेत. शिवाय, पाच दहशवतवाद्यांना अटक करण्यात देखील यश आले आहे.


            अफगाणिस्तानच्या सैन्याद्वारे १५ प्रांतामध्ये दहशतवाद्यांविरोधात १८ अभियान राबवण्यात आले होते. यासंदर्भात अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाद्वारे करण्यात आलेल्या ट्विटमध्ये सांगण्यात आले आहे की, मागील २४ तासांत अफगाणिस्तानमधील १५ प्रांतांमध्ये १८ अभियान राबवण्यात आले. ज्यामध्ये तब्बल १०९ दहशतवाद्यांचा खात्मा झाला. 


               तर अन्य ४५ दहशतवादी जखमी झाले आहेत. शिवाय, पाच दहशतवाद्यांना अटक करण्यात यश आले आहे. कारवाईत ठार करण्यात आलेले दहशतवादी हे एकाच दहशतवादी संघटनेचे होते की विविध संघटनांचे होते, याबाबत अद्यापपर्यंत अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाकडून अधिकृतपणे काही सांगण्यात आलेले नाही.
 

मागे

नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत चोपलं, पत्नीची थिएटरमध्ये मर्दानी
नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत चोपलं, पत्नीची थिएटरमध्ये मर्दानी

                अभिनेत्री राणी मुखर्जीची मुख्य भूमिका असलेल्या ‘मर....

अधिक वाचा

पुढे  

कोण होणार भारताचे पहिले 'चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ'?
कोण होणार भारताचे पहिले 'चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ'?

         नवी दिल्ली - भारताच्या 'चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ' (Chief of Defence Staff) पदासा....

Read more