ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

नाशिक रोड रेल्वे स्थानकात ओक्सिजन पार्लर

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 20, 2019 11:43 AM 2019-02-12T14:15:30+5:30

नाशिक रोड रेल्वे स्थानकात ओक्सिजन पार्लर

शहर : नाशिक

         नाशिक - देशातील प्रमुख शहरात औद्योगीकरणामुळे दिवसेंदिवस प्रदूषण पातळी वाढत आहे त्यातच ऑक्सिजनचीही कमतरता भासू लागली. स्वच्छ आणि शुद्ध ऑक्सीजन मिळणं काही शहरांमध्येअशक्य झाले आहे. पण हेच ऑक्सिजन 24 तास मिळण्यासाठी नाशिक रेल्वे स्टेशनवर ऑक्सिजन पार्लर उभारण्यात आले आहे.


           देशातील पहिले ऑक्सिजन पार्लर असल्याने आणि अनोख्या प्रयोगामुळे बरेच लोक या पार्लरला भेट देत आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने स्नेक प्लांट, आरेलिया बुश, ड्रॅगन बांबू, चायनीज बांबू, मनीप्लँट, झामीया, झेड प्लांट, बोनझा अशी झाडं येथे लावण्यात आली आहेत. या सर्व झाडांची नावे तुम्हाला नवीन वाटत असली तरीही सर्व झाडं प्रदूषण दूर करून ऑक्सिजन निर्माण करण्याचं काम करतात.


        नासाच्या अभ्यासातही ही झाडं आरोग्यास उपायकारक असल्याचं सिद्द झाले असून ही सर्व झाडांची रोपं नाशिकरोड स्टेशनवरील ऑक्सिजन पार्लरमध्ये बघायला मिळत आहेत. एकूण 18 प्राजाती येथे उपलब्ध असून हे एक झाड 10 बाय 10 परिसरातील हवा शुद्ध करण्याचं काम करते. तसेच 24 तास ऑक्सिजनचा पुरवठा करते. विशेष म्हणजे या झाडांना 8 दिवसातून एकदाच पाणी टाकावे लागते.

       रेल्वेस्टेशन म्हंटलं तर प्रदूषण हे आलेच पण आता या ऑक्सिजन पार्लरमुळे नाशिकरोड रेल्वेस्टेशनचा परिसर प्रदूषण मुक्त होण्यास मदत होणार आहे. रेल्वे प्रशासनाच्या निम फ्रिज पॉलिसी अंतर्गत हा उपक्रम राबवला जात असून रेल्वे भाडे तसेच तिकीट विक्री व्यतिरिक्त रेल्वेला या माध्यमातून नफाही मिळणार आहे. अशाप्रकारचे पार्लर असणारे नाशिकरोड रेल्वेस्टेशन हे पहिलेच असे स्टेशन आहे.

         दरम्यान, या ऑक्सिजन पार्लरमुळे येथे येणाऱ्या प्रवाशांना ही वेगळीच अनुभूती येते. ऑक्सिजन पार्लर बघताच प्रवाशी आवर्जून त्या ठिकाणी बघण्यास जातात. त्यामुळे नाशिक रोड रेल्वे स्टेशन प्रशासनाने राबवलेला हा प्रयोग खरोखर उल्लेखणीय आहे. प्रदूषणाच्या विळख्यात अडकलेल्या इतर शहरांमधील रेल्वे स्टेशन परिसरात ही असा प्रयोग राबवावा म्हणजे जास्तीत जास्त ऑक्सिजनची निर्मिती होईल, असं लोकांकडून म्हटलं जात आहे.
 

मागे

मुंबईत नागरिकत्व कायद्यावरून सरकारला जोरदार विरोध प्रदर्शन
मुंबईत नागरिकत्व कायद्यावरून सरकारला जोरदार विरोध प्रदर्शन

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला होणाऱ्या विरोधाची धार दिवसेंदिवस तीव्र होता....

अधिक वाचा

पुढे  

चिमूरड्या विद्यार्थ्याकडून गटाराची सफाई
चिमूरड्या विद्यार्थ्याकडून गटाराची सफाई

             बुलडाणा - खामगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत....

Read more