ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना जीवे मारण्याचा प्रयत्न, व्हाईट हाऊसमध्ये विष पार्सल

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: सप्टेंबर 20, 2020 10:45 PM 2019-02-12T14:15:30+5:30

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना जीवे मारण्याचा प्रयत्न, व्हाईट हाऊसमध्ये विष पार्सल

शहर : विदेश

अमेरिकेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकांपूर्वी (US Election 2020) डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या हत्येचं षडयंत्र रचलं जात असल्याचा संशय आहे. कारण, व्हाईट हाऊस येथे डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाचं एक पार्सल पोहोचलं. या पार्सलमध्ये एक विषारी वस्तू होती. दरम्यान, पार्सल ट्रम्प यांच्यापर्यंत पोहोचण्यापूर्वी होणाऱ्या तपासणीत हे कारस्थान उघड झालं. माहितीनुसार, या आठवड्यातच हे पार्सल पाठवण्यात आलं होतं. हे पार्सल डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाने आलं होतं.या पार्सलला दोनवेळा तपासण्यात आलं. यामध्ये रिसिन (Ricin) नावाचं विष होतं. व्हाईट हाऊसमध्ये जे कुठलं पार्सल किंवा पत्र येतं ते डोनाल्ड ट्रम्प यांच्यापर्यंत पोहोचण्यापूर्वी तपासलं जातं. हे पार्सल कॅनडा येथून आल्याचा संशय आहे.

रिसिन किती घातक?

रिसिन हा एक विषारी पदार्थ आहे, जो एरंडेलच्या बियांमधून निघतो. याचा वापर दहशतवादी हल्ल्यांसाठीही केला जातो. याचा वापर पावडर, गोळी किंवा अॅसिडच्या रुपात केला जातो. जर कुठल्या पद्धतीने हे विष शरीरात गेलं, तर त्या व्यक्तीला उलट्या सुरु होतात आणि पोटात तसेच आतड्यांमध्ये अंतर्गत रक्तस्त्राव सुरु होतो. त्यामुळे लीव्हर, किडनी फेल होऊ शकते, त्यामुळे मृत्यू होण्याची शक्यता आहे (US Election 2020).सध्या फेडरल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (FBI) आणि सीक्रेट सर्विस या प्रकरणाचा तपास करत आहेत. हे पार्सल कोणी आणि कुठून पाठवलं याचा शोध घेतला जात आहे. सध्या सामान्य लोकांसोठी कुठलाही अलर्ट जारी करण्यात आलेला नाही.

 

मागे

रुग्णाला 'ऑक्सिजन' किती द्यायचा हा अधिकार डॉक्टरांचाच!
रुग्णाला 'ऑक्सिजन' किती द्यायचा हा अधिकार डॉक्टरांचाच!

रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांना उपचाराचा भाग म्हणून जो ऑक्सिजन दिला जा....

अधिक वाचा

पुढे  

करून दाखवलं... निर्बंध झुगारत मनसे कार्यकर्त्यांचा रेल्वेने प्रवास
करून दाखवलं... निर्बंध झुगारत मनसे कार्यकर्त्यांचा रेल्वेने प्रवास

सर्वसामान्य लोकांसाठी रेल्वे सेवा सुरु व्हावी, यासाठी सोमवारी मुंबईत मनसे....

Read more