By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 10, 2020 05:08 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : jammu
श्रीनगर- जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर पाकिस्तानने प्रचंड गोळीबार केला आहे. या गोळीबारात दोन जवान शहीद झाले असून दोन जवान गंभीर जखमी झाले आहेत. पुंछ जिल्ह्यातील गुलपूर सेक्टरमध्येही घटना घडली. शहीद झालेले जवान लष्करात पोर्टर म्हणून कार्यरत होते.
आज सकाळी ११च्या समुारास पाकिस्तानने पुंछमध्ये गोळीबार सुरू केला. पाकिस्तानी सैनिकांनी गुलपूर सेक्टरमध्ये मोर्टारचा मारा केला. अचानक झालेल्या या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले तर दोन जवान जखमी झाले. आर्मी पोर्टरवर हे जवान काम करत होते. त्यावेळी पाकिस्तानने अचानक गोळीबार करत मोर्टार डागले. त्यामुळे सीमेवर तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. भारतीय लष्कराने या गोळीबाराची पृष्टी केली आहे. पाकिस्तानच्या सैन्याने विनाकारण गोळीबार केल्याचं लष्कराकडून सांगण्यात आलं.
गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानकडून सातत्याने सीमेवर गोळीबार करण्यात येत आहे. शस्त्रसंधीचं उल्लंघन करत पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात येत आहे. पाकिस्तानच्या या भ्याड हल्ल्याला भारताकडून जशास तसे उत्तरही दिले जात आहे. भारताकडून जोरदार प्रत्युत्तर मिळत असल्यानेही पाकिस्तानकडून पुन्हा पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जात आहे.
दरम्यान, नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी काही दहशतवाद्यांनी नौशेरा सेक्टरमध्ये गोळीबार केला होता. त्यात दोन जवान शहीद झाले होते. त्यामुळे संपूर्ण परिसरात नाकेबंदी करण्यात आली होती.
इराण आणि अमेरिका यांच्यामधील राजकीय संबंध प्रचंड ताणवपूर्ण बनले आ....
अधिक वाचा