By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 29, 2019 07:14 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : delhi
जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटविल्यापासून पाकिस्तानचा जळजळाट सुरू आहे. त्यातच आंतरराष्ट्रीय पातळीवरून या प्रश्नावर भारतावर दबाव आणण्याचे प्रयत्नही फोल ठरले आहेत. त्यातच युद्धाच्या पोकळ धमक्यांचाही भारतावर काही परिणाम झालेला नाही. सीमेवर लष्करी कमांडो ठेवणे, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून दहशतवादी घुसविण्यातही पाकला जमलेले नाही. त्यामुळे अस्वस्थ झालेला पाक आता गुजरातमध्ये समुद्रमार्गाने दहशतवादी घुसविण्याचा प्रयत्न करीत असल्याचेही उघडकीस आले. काही दिवसांपूर्वी श्रीलंकेतून तामिळनाडूत दहशतवादी घुसविण्यात शक्यता व्यक्त करण्यात आली होती. आता पुन्हा पाकिस्तानी कमांडोच गुजरातच्या कांडलामध्ये कच्छमार्गे घुसण्याच्या तयारी असल्याची माहिती गुप्तचर संघटनेने दिल्याने तेथे दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.
श्रीलंका मार्गे तामिळनाडूत सहा दहशतवादी घुसल्याची माहिती समोर आली होती. गुप्तचर यंत्रणांना याबाबत माहिती मिळताच बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, इंडियन कोस्ट गार्ड यांनी हाय अलर्ट जारी केला आहे. समुद्रमार्गे भारतात येवून दहशतवादी हल्ला करणार असल्याचे कळते.
येत्या 2 सप्टेंबरपासून गणेशोत्सव सुरू होत आहे. या उत्सवात प्रसादातून घातपा....
अधिक वाचा