By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 10, 2019 07:09 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : jaipur
बालाकोट हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानने त्यांची हवाई हद्द विमानांसाठी बंद केली होती. यामुळे आंतरराष्ट्रीय विमानेही वळसा घालून भारतात किंवा पलिकडे जात-येत आहेत. यामुळे बंदी असतानाही अँटोनोव्ह एएन-12 हे मोठे मालवाहतूक विमान पाकिस्तानी हवाई क्षेत्रातून भारतीय हवाई हद्दीत आलेच कसे, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या विमानातून कशाची वाहतूक केली जात आहे. त्या विमानाला पाकिस्तानने का नाही रोखले, आदी प्रश्न उपस्थित होत आहेत.
पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानातील बालाकोटवर चढविलेल्या हवाई हल्ल्यामुळे दोन्ही देशांत तणावाचे वातावरण निर्माण झालेले आहे. यामुळे पाकिस्तानने हवाई हद्द सील केली आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानी हवाई क्षेत्रातून मालवाहतूक करणारे विमान भारतीय हद्दीत आल्याने हवाई दल सतर्क झाले आहे. लढाऊ विमानांनी या विमानाला जयपूर विमानतळावर उतरण्यास भाग पाडले आहे. हे विमान जॉर्जियाचे असून कराचीहून या विमानाने उड्डाण केले होते.
यामुळे हे मालवाहू विमान भारतीय हवाई क्षेत्रात येताच भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी लगेचच हवेत झेप घेतली आणि त्या विमानाचा पाठलाग केला. मालवाहतूक विमानाच्या पायलटला विमान जयपूर विमानतळावर उतरवण्याचे आदेश दिले. या प्रकाराबाबत पायलटची चौकशी करण्यात येत असून हे विमान दिल्लीला जात होते, अशी माहिती समोर आली आहे.
डहाणूतल्या आंबोली येथे दोन कार आणि एका मोटरसायकलची धडक झाली. या अपघातात पाच....
अधिक वाचा