By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 16, 2019 01:35 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
आर्थिकच्या संकटांशी झुंजणाऱ्या पाकिस्तानच्या नाड्या आवळण्यास सुरुवात झाली आहे. कुरापती केल्याने भारताकडून आधीच असहकाराची नामुष्की ओढवून घेतलेल्या पाकिस्तानला शेजारी राष्ट्राकडून आणखी एक झटका बसला आहे. पाकिस्तानच्या शेजारी अफगाणिस्तानने हंगामी निर्यात शुल्क वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. स्थानिक माध्यमांनी यासंदर्भातील वृत्त दिेले आहे. फळ आणि भाज्यांसंदर्भात अफगाणिस्तानने केवळ पाकिस्तानच नाही तर इराणवरील शुल्क देखील वाढवला असल्याचे अफगाणिस्तानच्या व्यापाऱ्यांनी 'टोलो न्यूज'ला सांगितले.
सध्या अफगाणिस्तानातील बाजारपेठा इराणी आणि पाकिस्तानच्या फळ आणि भाज्यांनी भरल्या आहेत. सरकार स्थानिक व्यापाऱ्यांना चालना देण्यासाठी काही करत नसल्याचा आरोप केला जात आहे. जेव्हा आमच्या फळांचा हंगाम येतो तेव्हा पाकिस्तान शुल्कात खूप वाढ करतो आणि आम्हाला आमची उत्पादन कमी किंमतीत विकावी लागतात असे अशरफ नावाच्या व्यापाऱ्याने सांगितले.
श्रीनगरच्या शोपिया भागातील सिंधु शेरमल परिसरात दहशतवाद्यांनी राजस्थानच्....
अधिक वाचा