ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

Ayodhya verdict : रामजन्मभूमीप्रकरणी न्यायालयाच्या निर्णयावर पाकिस्तानची प्रतिक्रिया

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 10, 2019 10:57 AM 2019-02-12T14:15:30+5:30

Ayodhya verdict : रामजन्मभूमीप्रकरणी न्यायालयाच्या निर्णयावर पाकिस्तानची प्रतिक्रिया

शहर : विदेश

अयोध्या राजमन्मभूमीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी निकालाची घोषणा केली. अयोध्येतील वादग्रस्त जमीन हिंदूना देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. या निकालानंतर पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी भारतावर टीका केली. भारतीय न्यायालयाने घेतलेला हा निर्णय आधीपासूनच दबलेल्या मुस्लिम समुदायावर अधिक दबाव टाकेल, असे कुरेशी यांनी म्हटले.

या निर्णयाचा तपशील वाचल्यानंतर पाकिस्तानकडून यासंदर्भात अधिकृत निवेदन जारी करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. तसेच हा निकाल जाणूनबुजून ऐतिहासिक कर्तारपूर कॉरिडोरच्या उद्धाटनावेळी जाहीर करण्यात आल्याचा आरोपही कुरेशी यांनी केला.

भारतीय सर्वोच्च न्यायालयाने मोठ्या कालावधीनंतर शनिवारी निर्णय जाहीर केला. भारतीय न्यायालयाने आजच निकाल जाहीर का केला, असा सवालही कुरेशी यांनी केला. पाकिस्तानचे मानवाधिकार मंत्री शिरीन मजारी यांनीही निकालाच्या वेळेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

दरम्यान, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून कुरेशी यांच्या टीकेला चोख प्रत्युत्तर देण्यात आले आहे. भारताच्या अंतर्गत नागरी प्रश्नासंदर्भात पाकिस्तानने व्यक्त केलेली अनावश्यक प्रतिक्रिया आम्ही नाकारत असून या प्रतिक्रिया निंदनीय असल्याचे म्हणत भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानला फटकारले.

मागे

Ayodhya Verdict: अन् शिवनेरी किल्ल्यावरच्या मातीने चमत्कार घडला- उद्धव ठाकरे
Ayodhya Verdict: अन् शिवनेरी किल्ल्यावरच्या मातीने चमत्कार घडला- उद्धव ठाकरे

अयोध्येतील राम मंदिरासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे ....

अधिक वाचा

पुढे  

अयोध्या निकालाचे स्वागत, मुस्लिम बांधवांकडून दुर्गामातेची पूजा
अयोध्या निकालाचे स्वागत, मुस्लिम बांधवांकडून दुर्गामातेची पूजा

रामजन्मभूमी आणि बाबरी मशिद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच....

Read more