By GARJA ADMIN | प्रकाशित: एप्रिल 01, 2019 06:21 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : srinagar
नियंत्रन रेषेवर सातत्याने कुरापती काढणाऱ्या पाकिस्ताने आज पुन्हा एकदा शस्रसंधीचे उल्लंघन केले असून, पुंछ जिल्ह्यातील मनकोट आणि कृष्णा घाटी परिसरात पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबारात एक जवान शहीद झाला आहे, तर चार जवान जखमी झाले आहेत. तसेच या गोळीबारात एका पाच वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. आज सकाऴापासूनच पुंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेला लागून असलेल्या मनकोट आणि कृष्णा घाटी परिसरात पाकिस्तानने शस्रसंधीचे उल्लंघन करून गोळीबार सुरू केला. या गोळीबारात भारताचे पाच जवान जखमी झाले. त्यापैकी एका जवानाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, या गोळीबारात एका पाच वर्षीय मुलीचाही मृत्यू झाल्याची माहिती पुंछ जिल्ह्याचे डीडीसी राहुल यादव यांनी दिली.
अंदमान-निकोबार द्वीप समूहामध्ये सोमवारी पहाटे दोन तासात मध्यम तीव्रतेचे न....
अधिक वाचा