ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानी कलाकारांच्या प्रतिक्रिया;पाकिस्तानी जनतेला आवाज बुलंद करण्यास सांगितले

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 05, 2019 07:01 PM 2019-02-12T14:15:30+5:30

काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानी कलाकारांच्या प्रतिक्रिया;पाकिस्तानी जनतेला आवाज बुलंद करण्यास सांगितले

शहर : देश

राज्यसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कलम ३७० रद्द करण्याचा प्रस्ताव ठेवला. काश्मीरमधील कलम ३५ हटवण्याच्या निर्णयाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही मंजुरी दिली आहे. हे दुरुस्ती विधेयक संसदेत मंजूर झाल्यानंतर जम्मू आणि काश्मीर राज्याला लाभलेला स्वायत्त राज्याचा दर्जा संपुष्टात येणार आहे. सरकारच्या या निर्णयानंतर देशात प्रचंड आनंदाचं वातावरण पसरलं आहे. परंतू पाकिस्तानी कलाकारांनी काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानी जनतेला आवाज बुलंद करण्यास सांगितले आहे.

पाकिस्तानी कलाकार मात्र या निर्णयाचा सोशल मीडियाच्या माध्यमातून या निर्णयाचा विरोध करत आहेत. 'मी पाकिस्तानी कलाकारांना विनंती करते की ते आपला आवाज का नाही उठवत?' काश्मीरी मुद्द्यांवर आवाज बुलंद करण्याची मागणी पाकिस्तानी अभिनेत्री हमजा अली अब्बासने ट्विटरच्या माध्यमातून केली आहे.

अभिनेत्री हमजा अली अब्बास शिवाय अनेक पाकिस्तानी कलाकारांनी काश्मीर मुद्द्यांवर आवाज उठवण्याचे आवाहन सोशल मीडियाच्या माध्यमातून केले आहे

त्याचप्रमाणे बॉलिवूडच्या बऱ्याच कलाकारांनी या मुद्द्यावर त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. ज्यामध्ये अभिनेते अनुपम खेर, परेश रावल यांचाही समावेश आहे. विविध स्तरांतून आता काश्मीर मुद्द्यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात झाली आहे. तेव्हा आता संमिश्र प्रतिक्रियांच्या या वातावरणात पुढे कोणत्या मुद्द्यांना चालना मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे

मागे

जम्मू-काश्मीरच्या ऐतिहासिक निर्णयानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया
जम्मू-काश्मीरच्या ऐतिहासिक निर्णयानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया

जम्मू-काश्मीरच्या प्रश्नाबाबत केंद्र सरकारने सोमवारी ऐतिहासिक निर्णय घेत....

अधिक वाचा

पुढे  

अनुच्छेद ३७० हटवल्यानंतर जल्लोष केल्याने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर  गुन्हा दाखल
अनुच्छेद ३७० हटवल्यानंतर जल्लोष केल्याने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

जम्मू कश्मीरमधून अनुच्छेद 370 काढण्याचा निर्णय घेतल्यानंतर देशभरात जल्लोष ....

Read more