ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

हातावर विलगीकरणाचा शिक्का असताना रेल्वेतून प्रवास

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 18, 2020 06:52 PM 2019-02-12T14:15:30+5:30

हातावर विलगीकरणाचा शिक्का असताना रेल्वेतून प्रवास

शहर : मुंबई

लोकांमध्ये कोरोनाची धास्ती असतानाच आज मुंबईतून दिल्लीकडे जाणाऱ्या गरीबरथ ट्रेनमध्ये हातावर विलगीकरणाचा शिक्का असलेल्या चौघा प्रवाशांना पाहून सहप्रवासी धास्तावले. तिकीट तपासणींनाही ही बाब समजताच त्यांनी या प्रवाशांना रेल्वेनं प्रवास करण्यास मज्जाव केला आणि पालघर इथं रेल्वे थांबवून चौघांनाही गाडीतून उतरवण्यात आलं.

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर परदेशातून येणाऱ्या सर्व प्रवाशांचं विमानतळावर स्क्रीनिंग केलं जातं. जे प्रवासी कोरोनाबाधित देशातून येतात व ज्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणं आढळतात त्यांना थेट कस्तुरबा रुग्णालयात दाखल केले जाते. तर कोरोनाबाधित देशातून येणाऱ्या पण कोरोनाची लक्षणं नसलेल्या प्रवाशांना रुग्णालयात विगलीकरण कक्षात ठेवून त्यांची तपासणी केली जाते. तर अन्य देशातून येणाऱ्या प्रवाशांना पण ज्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणं दिसत नाहीत त्यांना हातावर निवडणुकीच्यावेळी वापरल्या जाणाऱ्या शाईने विलगीकरणाचा शिक्का मारून त्यांना घरीच वेगळं राहून इतरांच्या संपर्कात येऊ नये असं सांगितलं जातं. होम क्वॉरंटाईन्ड असा शिक्का त्यांच्या हातावर मारला जातो. अशा व्यक्तिंमध्ये कोरोनाची लक्षणं नसली तरी ते परदेशातून आल्यानं खबरदारी म्हणून त्यांना वेगळं राहण्यास सांगण्यात येतं. घरातील व्यक्तींच्याही संपर्कात येऊ नये अशी सूचना त्यांना केलेली असते.

'या' देशातून आले होते चौघे प्रवासी

मुंबईकडून दिल्लीकडे जाणाऱ्या गरीबरथमध्ये हातावर अशा प्रकारचे शिक्के असलेले चौघेजण आढळल्यानंतर पालघरला गाडी थांबवून त्यांना आरोग्य विभागाच्या ताब्यात देण्यात आले. हे चौघेजण जर्मनीहून आले होते आणि सुरतकडे जात होते. विमानतळावर त्यांच्या हातावर शिक्के मारून त्यांना १४ दिवस घरी विलगीकरण करण्याची सूचना केली होती. पण ते रेल्वेनं सुरतला चालले होते.

सहप्रवाशांनी त्यांच्या हातावरील शिक्के पाहिल्यानंतर तिकीट तपासनीसाला कळवले. त्यानंतर पालघरमध्ये गाडी थांबवण्यात आली. पालघरच्या आरोग्य पथकाकडून तपासणी केल्यानंतर त्यांना खाजगी वाहनातून त्यांच्या गावी पाठवण्याबाबत विचार सुरु असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. या व्यक्तीचे नमुने तपासणीसाठी कस्तुरबा रुग्णालयात पाठवण्यात येत असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. तसंच डहाणूच्या कॉटेज रुग्णालयातील विलगीकरण कक्षात एका संशयिताला दाखल करण्यात आले आहे.

 

मागे

'वर्क फ्रॉर्म होम' नियमाची अंमलबजावणी न करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई
'वर्क फ्रॉर्म होम' नियमाची अंमलबजावणी न करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर ज्या कंपन्या ५० टक्के कर्मचाऱ्यांना वर्....

अधिक वाचा

पुढे  

जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार, साठेबाजी करणाऱ्यांवर कठोर कारवाई - भुजबळ
जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार, साठेबाजी करणाऱ्यांवर कठोर कारवाई - भुजबळ

राज्यात कोरोना व्हायरसचा सर्वत्र उद्रेक झाल्यामुळे जीवनावश्यक वस्तुंचा त....

Read more