ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

...तर पॅन कार्ड रद्द होणार,आयकर विभागाचा इशारा

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 16, 2020 01:10 PM 2019-02-12T14:15:30+5:30

...तर पॅन कार्ड रद्द होणार,आयकर विभागाचा इशारा

शहर : देश

देशातील 17 कोटी नागरिकांनी अद्यापही आपलं पॅन कार्ड आधार कार्डसोबत लिंक केलेलं नाही. मात्र, येत्या 31 मार्च 2020 पर्यंत पॅन कार्डला आधार कार्डसोबत लिंक केलं नाही तर 17 कोटी नागरिकांचे पॅन कार्ड रद्द होईल, असा निर्वाणीचा इशारा केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने (सीबीडीटी) दिला आहे .

पॅन कार्डला आधार कार्डसोबत लिंक करण्यासाठी केंद्र सरकारने याअगोदर अनेकवेळा मुदतवाढ दिली आहे. मात्र, अजूनही देशातील 17 कोटी नागरिकांनी आपलं पॅन कार्ड आधार कार्डसोबत लिंक केलेलं नाही. त्यामुळे येत्या 31 मार्च 2020 पर्यंत या नागरिकांनी पॅन कार्ड आधार कार्डसोबत लिंक केलं नाही तर त्यांचे पॅन कार्ड रद्द होणार आहे.

सीबीडीटीने दिलेल्या माहितीनुसार, 27 जानेवारी 2020 पर्यंत 30.75 कोटी पॅन कार्ड आधार कार्डसोबत लिंक करण्यात आले आहेत. मात्र, तरीही अजून 17.58 कोटी पॅन कार्ड आधार कार्डसोबत लिंक करण्यात आलेले नाहीत.

कलम 139 अअ(2)च्या अंतर्गत 1 जुलै 2017 पर्यंत ज्या लोकांकडे पॅन कार्ड आणि आधार कार्ड आहेत त्यांनी आयकर विभागाला आधार क्रमांकाचा नंबर देणं अनिवार्य आहे.

कसं कराल पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक?

सर्वात अगोदर आयकर विभागाची अधिकृत वेबसाईट incometaxindiaefiling.gov.in वर जावं लागेल.

वेबसाईटवर आल्यानंतर डाव्या बाजूला आधार कार्डशी लिंक करण्याचा पर्याय दिसेल.

त्यानंतर नवीन पेज ओपन होईल. या नव्या पेजवर लाल रंगात Click here असं लिहिलं असेल.

तुम्ही याअगोदर पॅन कार्ड आधार कार्डसोबत लिंक केलं असेल तर या पेजवर क्लिक करुन तुम्ही त्याची पडताळणी करु शकतात.

तुम्ही लिंक केलं नसेल तर Click here च्या खाली बॉक्समध्ये पॅन नंबर, आधार नंबर आणि नाव विचारलं असेल. ते सर्व पर्याय भरायचे.

त्यानंतर Link Aadhar या पर्यायावर क्लिक करायचे. या क्लिकसोबतच पॅन कार्डला आधार कार्डसोबत लिंक करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.

मागे

कोरेगाव-भीमा प्रकरणी माहिती लपवण्याचा केंद्राचा डाव - शरद पवार
कोरेगाव-भीमा प्रकरणी माहिती लपवण्याचा केंद्राचा डाव - शरद पवार

कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणात माहिती लपवण्याचा केंद्र सरकारचा डाव आहे. रा....

अधिक वाचा

पुढे  

चीनमध्ये कोरोना व्हायरसचा धुमाकूळ सुरुच,कोरोनाच्या बळींची संख्या १६०० च्या वर
चीनमध्ये कोरोना व्हायरसचा धुमाकूळ सुरुच,कोरोनाच्या बळींची संख्या १६०० च्या वर

चीनमध्ये कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांचा आकडा आता दीड हजारापलिकेडे गेला आ....

Read more