By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 21, 2019 07:18 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
100 रुपये प्रतिकिलो किंवा त्याहून कमी किमतीच्या बिस्किटावरील जीएसटी कमी करण्याची मागणी सरकारने मान्य केली नाही तर, पार्ले प्रोडक्टसमधील 10000 कामगारांना नोकरी गमवावी लागण्याची शक्यता आहे. उपभोक्त्याकडून बिस्किटाची मागणीही घटली आहे. विक्री घटल्याचा मोठा तोटा कंपनीला सहन करावा लागत आहे, असे कंपनीचे कॅटेगरी हेड मयांक शाह यांनी संगितले.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, पार्ले प्रॉडक्ट बिस्किटाचे उत्पादन करणारी देशातील सर्वात मोठी कंपनी आहे. "अधिक जीएसटी आकारल्याने उपभोक्त्याकडून मागणी घटली आहे. त्यामुळे किरकोळ विक्रेतेही प्रोडक्टसची खरेदी करीत नाहीत. सरकार यावर काही पावलं उचलीत नाही. त्यामुळे परिस्थिती अजूनच खराब झाली आहे. कमी किमतींची बिस्किटे कमी नफ्यासह विकली जातात. अशी अनेक प्रकारची बिस्किटे आहेत जी मध्यम वर्गाला आणि आर्थिक उत्पन्न कमी असणार्या वर्गाला लक्ष करून निर्माण केली जातात. बिस्किटाची मागणी पूर्ववत व्हावी, यासाठी सरकार कर कमी करील, असा विश्वास आहे. पण तसे झाले नाही, तर मात्र आमच्या विविध कारखान्यांमध्ये काम करणार्या 8 ते 10 हजार कामगारांना कमी कारव लागेल", असेही शाह यांनी संगितले.
रेल्वे प्रशासनाने यावर्षीही 3 नोव्हेबरपासून रामायण एक्सप्रेस चालविण्याचा....
अधिक वाचा