ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

हरिग्राम येथील महिलांचा मतदान जनजागृती कार्यक्रमात सहभाग

By Anuj Kesarkar | प्रकाशित: ऑक्टोबर 21, 2019 02:47 PM 2019-02-12T14:15:30+5:30

हरिग्राम येथील महिलांचा मतदान जनजागृती कार्यक्रमात सहभाग

शहर : रायगड

रायगड महिला व बालविकास कार्यालया तर्फे मतदान जनजागृती अभियानात हरिग्राम महिलांनी आपला सहभाग नोंदवला. कार्यलयातर्फे  दीप्ती रामरामे जिल्हा महिला सरंक्षण अधिकारी आणि कैलास डोईफोडे सहाय्यक सरंक्षण अधिकारी यांनी हरिग्राम येथील महिलांना एकत्र करून २०१९ चे मतदान जागृती अभियाना अंतर्गत मतदान करण्यास आवाहन केले. यावेळी कैलास डोईफोडे यांनी मतदान करण्याविषयी माहिती दिली. मतदानाचा हक्क प्रत्येक नागरिकाला बजाविणे गरजेचे असून त्यामुळे मतदानची टक्केवारी वाढेल असे आवाहन या अभियाना अंतर्गत करण्यात आले. तसेच मधुरा फौंडेशनच्या अध्यक्षा चित्रा देशमुख यांनी सर्व महिलांना मतदानाचा हक्क घटनेत दिला असून ते कर्तव्य आहे याबद्दल माहिती दिली.

दिप्ती रामरामे यांनी मतदानाची ताकद काय असते आणि सुजाण नागरिकांची मतदान करणे ही मोठी जबाबदारी आहे, ती सर्वांनी पाळली पाहिजे असे मत व्यक्त केले. प्रियांका पाटील यांनी या सरकारी अभियानाबद्दल महिला व बालकल्याण विकास विभागाचे आभार व्यक्त केले.

यावेळी हरिग्रामच्या सरपंच यमुना जाधव, प्रियांका पाटील, वनिता चंद्रकांत जाधव, वैशाली विक्रम नरावडे, निर्मला छगन म्हात्रे, सुषमा हनुमान घरत, हर्षदा गुलमकर व ग्रामस्थ उपस्थित होते.

मागे

65 ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड
65 ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड

 आज होत असलेल्या निवडणुकीसाठी मतदानाचा टक्का वाढवा यासाठी निवडणूक आयोगा....

अधिक वाचा

पुढे  

पित्याच्या अस्थी घेऊन 7 मुलांनी केले मतदान
पित्याच्या अस्थी घेऊन 7 मुलांनी केले मतदान

संध्याकाळी साडेपाच पर्यन्त महाराष्ट्रात ५३.४६ टक्के मात्द्न झाल्याचे दिस....

Read more