ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

आता ओळखता येणार तोतया तिकीट तपासनीसांना..

By PRIYANKA BAGAL | प्रकाशित: एप्रिल 10, 2019 11:03 AM 2019-02-12T14:15:30+5:30

आता  ओळखता येणार तोतया तिकीट तपासनीसांना..

शहर : मुंबई

आता मुंबई उपवगरीय रेल्वे मार्गावर ओळखता येणार तोतया तिकीट तपासनीसांना.. रेल्वे मार्गावर तोतया तिकीट तपासनीसांमुळे प्रवाशांची लूट होत असल्याने त्याला आळा घालण्यासाठी मध्य रेल्वेने प्रायोगिक तत्त्वावर एक प्रकल्प हाती घेतलाय. तिकीट तपासनीसांना क्यूआर कोड असलेले ओळखपत्र देण्यात आले  आहे. त्यामूळे  प्रवासी मोबाइलवर हा कोड स्कॅन करून तिकीट तपासनीस तोतया आहे की रेल्वेचा कर्मचारी हे ओळखू शकणार आहेत.

गेल्या काही वर्षांत पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या उपनगरीय स्थानकांत तोतया तिकीट तपासनीसांचाही सुळसुळाट झाला होता. त्यांना आळा घालण्यासाठी मध्य रेल्वेने प्रायोगिक तत्त्वावर एक प्रकल्प ठाणे या स्थानकात राबविण्यास सुरुवात केलीय. यामध्ये तिकीट तपासनीसांना क्यूआर कोड असलेले ओळखपत्र देण्यात आले असून हा क्यूआर कोड रेल्वेच्या सव्‍‌र्हरशी जोडण्यात आलाय. त्यात तिकीट तपासनीसांची सर्व माहिती उपलब्ध आहे. तिकीट तपासनीसांच्या ओळखपत्रावरील क्यूआर कोड प्रवासी आपल्या मोबाइलवरून स्कॅन करू शकतील. स्कॅन करताच प्रवाशांना त्यांच्या मोबाइलवर तिकीट तपासनीसाची सर्व माहिती उपलब्ध होणार आहे. त्यामुळे तिकीट तपासनीस रेल्वेचा कर्मचारी आहे की तोतया हे तात्काळ समजण्यास मदत मिळेल. ठाणे स्थानकात हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतरच त्याची अन्यत्र अंमलबजावणी केली जाईल, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली. यापूर्वी प्रवाशांच्या जार्गृतेमुळे डिसेंबर २०१८ मध्ये मध्य रेल्वेच्या अंबरनाथ स्थानकात दोन विद्यार्थिनींनी एका तोतया महिला तिकीट तपासनीसाला पोलिसांच्या हवाली केले होते. तर,जानेवारी २०१९ मध्येही एका तोतया  तिकीट तपासनीसाला पकडण्यात आले होते.

मागे

अमेझॉन संस्थापक जेफ बेजोस-मॅकेन्झी यांचा जगातील सर्वात महागड घटस्फोट
अमेझॉन संस्थापक जेफ बेजोस-मॅकेन्झी यांचा जगातील सर्वात महागड घटस्फोट

जेफ-मॅकेन्झी यांचा घटस्फोट हा जगातील सर्वात महागडा घटस्फोट ठरलाय आहे. घटस्....

अधिक वाचा

पुढे  

यूट्यूबचा भारतात जास्तीत जास्त वापर
यूट्यूबचा भारतात जास्तीत जास्त वापर

स्वस्त इंटरनेट आणि स्मार्टफोन यामुळे भारतात यूट्यूबचा वापर अधिक वाढलेला आ....

Read more