By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 27, 2019 12:31 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : रत्नागिरी
माकडांना बिस्कीट देताना तोल गेल्याने सुमारे दोनशे फूट दरीत कोसळून पाटण येथील तरूणाचा दुर्दैवी अंत झाला. गुरूवारी सायंकाळी 5.30 च्या सुमारास चिपळूण तालुक्यातील कुंभार्ली घाटात ही दुर्घटना घडली घडली. तब्बल दीड तासांच्या शोधकार्यानंतर सुरेश विभूते (32, रा. पाटण) याचा मृतदेह सापडला.
मिळालेल्या माहितीनुसार खेर्डी येथे लिफ्टचे काम करण्यासाठी पाटण येथून सुरेश विभुतेसह काही कामगार आले होते. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास कुंभार्ली घाटातील एका वळणावर विभुते आपल्या सहकाऱयांसह थांबला होता. त्याठिकाणी असलेल्या माकडांना बिस्किटे खाऊ घालण्यासाठी तो संरक्षक कठडय़ावर बसला होता. याचवेळी माकडांना बिस्केटे देत असताना त्याचा तोल गेला आणि ते सुमारे 200 फूट खोल दरीत कोसळला.
आपला सहकारी दरीत कोसळल्याचे लक्षात येताच साऱयांच्या पायाखालची वाळू सरकली. त्यांनी आरडाओरड सुरू केली. घाटमाथ्यावरून येणाऱया-जाणा-या वाहनांना थांबवून त्यांनी या घटनेची माहिती दिली. त्यानंतर ही बातमी पोफळी नाक्यापर्यंत पोहचताच युवकांसह व्यापारी व ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. दुर्घटनेचे ठिकाण घाटमाथ्यापासून दीड ते दोन किलोमीटरवर, तर पोफळीपासून सुमारे साडेपाच किलोमीटरवर असल्याने त्याठिकाणी तातडीची मदत पोहचली नाही.
या घटनेची माहिती मिळताच अलोरे-शिरगांव पोलीस स्थानकाचे पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. कातकरी वस्तीतील बबल्या निकम, संदीप निकम यांच्यासह संतोष सरफरे, बाबू शिर्के, समीर हिरे, बाबू कदम, सुहास शिंदे, गणेश शिंदे या पोफळीतील युवक तसेच पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली. जवळपास दीड तासांच्या शोधकार्यानंतर सुरेश विभुतेचा मृतदेह सापडला.
जिल्हा काँग्रेसमधील अंतर्गंत वाद पुन्हा चव्हाटय़ावर आले आहेत. ....
अधिक वाचा