By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: ऑगस्ट 11, 2020 06:12 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
कोरोनाचे लक्षणे आढळल्यास ज्येष्ठ नागरिकांना करोना रुग्णालयात दाखल होणे आता बंधनकारक असणार आहे. करोना संसर्गाचा धोका टाळण्यासाठी मुंबई पालिकेने हा निर्णय घेतला आहे. ६० वर्षांवरील लक्षणे असलेल्या रुग्णांना घरी विलगीकरण करू नये, असे आदेश पालिकेने दिले असल्याचे विभागीय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
घरात स्वतंत्र खोली असल्यास सौम्य आणि मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांना घरीच विलगीकरणाची परवानगी आयसीएमआरने दिली असल्यामुळे इमारतीतील बहुतांश रुग्णांचा घरीच विलगीकरणात राहण्याकडे कल आहे. परंतू जोखीम बघता ६० वर्षांवरील लक्षणे असलेल्या रुग्णांना घरी विलगीकरण करू नये, असे आदेश पालिकेने दिले कारण ज्येष्ठ रुग्णांची प्रकृती अचानक बिघडल्यामुळे अधिक मृत्यू झाल्याचा घटना घडल्यामुळे हा निर्णय घेण्यात येत आहे.मुंबईत सर्वाधिक म्हणजे ५७ टक्के मृत्यू हे ६० वर्षांवरील रुग्णांचे झाल्याची नोंद आहे.
देशाच्या एकूण कोरोना रुग्णसंख्येपैकी 80 टक्के रुग्ण हे 10 राज्यांमध्ये आहेत. ....
अधिक वाचा