By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 31, 2020 11:54 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
कोरोनाव्हायरस लॉकडाऊन दरम्यान फळ आणि भाजीपाला खरेदी करण्यासाठी दादरच्या क्रांतीसिंग नानापाटील मंडई येथे लोकांची गर्दी पाहायला मिळत आहे. वारंवार आवाहन करुनही लोक गर्दी करताना दिसत आहेत. दादर येथील भाजीमंडई बंद करण्यात आली असताना काही ठिकाणी पुन्हा भाजीपाला घेण्यासाठी गर्दी दिसून येत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
Mumbai: People flock to Kranti Singh Nanapatil Mandi in Dadar, to purchase fruits and vegetables amid #CoronavirusLockdown. pic.twitter.com/1ncCpNGWEz
— ANI (@ANI) March 31, 2020
नागरिकांनी नी गर्दी करु नये, २४ तास दुकाने उघडी आहेत. गरज असेल तेव्हा एकानेच बाहेर पडा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. असे असताना गर्दी उसळत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. दरम्यान, लॉकडाऊन दरम्यान, अनेक लोक घराबाहेर पडत असल्याने कडक पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. तपासणीही पोलिसांकडून करण्यात येत आहे.
Mumbai: Security tightened as Police personnel check passes and identity cards of people amid the movement of vehicles during #CoronavirusLockdown. Movement of those providing or availing essential services are being allowed. Visuals from Mahim. pic.twitter.com/1SIZjEel8P
— ANI (@ANI) March 31, 2020
मुंबईत कोरोनाव्हायरस लॉकडाऊन दरम्यान वाहनांच्या हालचाली सुरु आहेत. दरम्यान पोलीस कर्मचार्यांनी पास आणि लोकांची ओळखपत्रे तपासण्यास सुरुवात करण्यात सुरुवात केली आहे. काही ठिकाणी तपासणी सुरु असताना सुरक्षा अधिक कडक केली गेली. अत्यावश्यक सेवा प्रदान करणार्या किंवा त्यांचा लाभ घेण्याच्या हालचालींना परवानगी देण्यात ये आहे. माहीम येथेही कडक पोलीस तपासणी करण्यात येत आहे.
‘कोरोना’चा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्राला २५ हजार कोटी....
अधिक वाचा