ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

पुण्यात पुन्हा एल्गार परिषद होणार, आता भाजप नेमकं काय करणार?

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 24, 2021 10:25 AM 2019-02-12T14:15:30+5:30

पुण्यात पुन्हा एल्गार परिषद होणार, आता भाजप नेमकं काय करणार?

शहर : पुणे

एल्गार परिषदेला अखेर परवानगी देण्यात आली आहे. माजी न्यायमूर्ती बी.जे. कोळसे पाटील यांनी पुणे पोलिसांकडे ही परवानगी मागितलेली होती. अखेर पुणे पोलिसांनी ही परवानगी दिलेली आहे. 30 जानेवारीला ही परिषद होणार आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून माजी न्यायमूर्ती बी.जे. कोळसे पाटील एल्गार परिषदेला परवानगी मिळावी म्हणून  झटत होते. अखेर पुणे पोलिसांनी ही परवानगी दिलेली आहे. ही परिषद येत्या शनिवारी (30 तारखेला) स्वारगेट येथील श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे होणार आहे.निवृत्त न्यायाधीश बी. जी. कोळसे पाटील यांनी एल्गार परिषदेला परवानगी मिळावी, यासाठी अर्ज स्वारगेट पोलिसांकडे दिला होता.

कोणत्याही परिस्थितीत एल्गार परिषद होणारच, असा निर्धार बी.जे. कोळसे पाटील यांनी केला होता. राज्य सरकारने सभागृहात परवानगी दिली नाही तर एल्गार परिषद रस्त्यावर घेऊ, असे कोळसे-पाटील यांनी सांगितलं होतं. शिवाय हे सरकार मनुवादी विचारांनी ग्रासले आहे. सरकार कुणाचंही असलं तरी बाटली जुनी फक्त पाणी नवं आहे, अशा शेलक्या शब्दात कोळसे पाटलांनी हल्ला चढवला होता.

 

यापूर्वी पुणे पोलिसांनी 31 डिसेंबरच्या नियोजित एल्गार परिषदेला परवानगी नाकारली होती. कोरोना परिस्थिती आणि रात्रीच्या संचारबंदीचे (नाईट कर्फ्यू) कारण देत स्वारगेट पोलिसांनी ही परवानगी नाकारल्याचे सांगण्यात आले होते.

भाजप तसंच उजव्या विचारसरणीच्या लोकांनी, पक्षांनी किंबहुना संस्थांनी पुण्यातील एल्गार परिषदेच्या आयोजनाला कायमच विरोध केलाय. ही परिषद होऊ नये म्हणून तत्सम मंडळींनी जोरदार प्रयत्न केले. मात्र असं असतानाही आता 30 जानेवारीला ही परिषद पुण्यात पार पडतीय. त्यामुळे भाजपच्या भूमिकेकडे किंबहुना हालचालीकडे सगळ्यांचंच लक्ष असेल.

एल्गार परिषद वादाची किनार का?

डिसेंबर 2017 ला शनिवार वाड्यात एल्गार परिषद पार पडली. त्यानंतर कोरेगाव-भीमाला मोठी दंगल उसळली होती. या दंगलीचा थेट संबंध एल्गार परिषदेशी जोडण्यात आला अन एल्गार परिषदेवर राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडवल्याचा ठपका ठेवण्यात आला. त्यानंतर हा तपास एनआयएने ताब्यात घेत देशभरात डाव्या विचारांच्या अनेक बुद्धिजीवींना अटक केली. यावरुन देशभरात डाव्या विचारांच्या लोकांनी मोठं काहूर माजवलं. या सगळ्या परिस्थितीत इतका वादंग सुरु असताना पोलिसांनी परवानगी देवो, अथवा न देवो यंदाही एल्गारची सांस्कृतिक परिषद होणारच, असा निर्धार बी. जी. कोळसे-पाटील यांनी व्यक्त केला होता.

एल्गार परिषदेविरोधात 118 याचिका दाखल

शहरी नक्षलवादाशी जोडली गेलेली एल्गार परिषद, त्यानंतर देशातील महत्त्वाच्या बुद्धिजीवींना झालेली अटक यावरुन मोठा वाद झाला. डाव्या आणि उजव्या विचारांचा हा संघर्ष इतक्या शिगेला पोहोचलाय की आत्तापर्यंत या प्रकरणात देशातील विविध न्यायालयात 118 याचिका दाखल आहेत.