By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: ऑक्टोबर 01, 2020 06:52 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
राज्यातील रेस्टॉरंट, बार आणि फूड कोर्ट सुरू करण्यास अखेर राज्य सरकारने परवानगी दिली आहे. ५ ऑक्टोबरपासून राज्यातील रेस्टॉरंट आणि बार सुरू होणार आहेत. पण ५० टक्के क्षमतेने रेस्टॉरंट आणि बार सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. राज्य सरकारने अनलॉक-5 चे नियम आज जाहीर केले आहेत.
रेस्टॉरंट आणि बार सुरू करताना कोणती काळजी घ्यायची, इतर काय अटी असतील हे पर्यटन विभाग लवकरच जाहीर करणार आहे. लॉकडाऊनमध्ये मार्च महिन्यापासून रेस्टॉरंट आणि बार बंद आहेत.
दुसरीकडे शाळा, महाविद्यालये हे ३१ ऑक्टोबरपर्यंत बंदच राहणार आहेत. सिनेमागृह, स्वीमिंग पूल देखील बंदच राहणार आहे. मेट्रोही बंद राहणार राहणार असल्याचं सरकारने म्हटलं आहे. गेल्या काही दिवसांपासून धार्मिक स्थळं खुली करण्याची मागणी होत आहे. मात्र अनलॉक 5 मध्ये देखील धार्मिक स्थळे ही बंद राहणार असल्याचं सरकारने स्पष्ट केलं आहे.
- मुंबईत डब्बेवाल्यांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
- राज्यात ऑक्सिजन सिलेंडरच्या वाहतुकीस मुक्त परवानगी
- राज्यांतर्गत धावणाऱ्या सर्व लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या सुरू करण्यास सशर्त परवानगी
- पुण्यात लोकल वाहतुक सुरू करण्यास परवानगी (मुंबईतील लोकल प्रवासाबाबतचे नियम लागू असणार )
- मुंबईत लोकलच्या फेऱ्या वाढवल्या जाणार
मुंबई बँकेतील (मुंबै बँक) गैरव्यवहाराच्या चौकशीचे आदेश सहकार विभागाने दिले....
अधिक वाचा