By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 10, 2019 03:01 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : jammu
जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला महामार्गावरून सामान्य नागरिकांना आठवड्यातून दोन दिवस वाहतूक बंद असते. यावेळी येथून वाहतूक करणार्या नागरिकांना मानसिक त्रासाचा सामना करावा लागतो. जम्मू-काश्मीरच्या महार्गावरून प्रवास करण्यासाठी एक असे प्रकरण समोर आले आहे कि यामुळे न्यू इंडिया आणि डिजिटल इंडिया यावर प्रश्नचिन्ह उभे राहते.
नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी ट्विटरवर एका फोटो शेअर केला आहे. यामध्ये एका व्यक्तीच्या हातावर शिक्का असून महामार्ग वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे. ओमर अब्दुल्ला म्हणाले कि, जम्मू-काश्मीरमधील नागरिकांना आपला राष्ट्रीय महामार्ग वापरण्याची परवानगी अशा पद्धतीने देण्यात येते. त्यांच्या हातावर शिक्का मारला जात आहे आणि लिहले जात आहे. मी काय बोलू हे सुचत नाही. कागद वाचविण्याच्या प्रयत्नांचा मजाक करायला पाहिजे का? मी केवळ नागरिकांसोबत केल्या जाणार्या अपमानजनक आणि अमानवीय व्यवहारावर नाराज आहे, असे त्यांनी ट्विटरद्वारे म्हंटले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला मोठा झटका दिला विरोधकांनीही मोदींना धारेव....
अधिक वाचा