ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलच्या दराबाबत मोठी बातमी, जाणून घ्या आजचा भाव

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 30, 2023 11:06 AM 2019-02-12T14:15:30+5:30

महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलच्या दराबाबत मोठी बातमी, जाणून घ्या आजचा भाव

शहर : पुणे

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार सामान्यांना मोठा दिलासा देणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार केंद्र सरकार लवकरच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करणार आहे.

 

गेल्या अनेक महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. पेट्रोल डिझेलचे दर दीर्घकाळापासून कायम आहेत. आता पेट्रोल डिझेलचे दर कमी करण्यासाठी पेट्रोलियम आणि अर्थ मंत्रालय चर्चा करत आहेत. याशिवाय तेल कंपन्यांशीही चर्चा सुरू आहे. सर्व काही सुरळीत राहिल्यास पेट्रोल आणि डिझेलचे दर 8 ते 10 रुपयांनी स्वस्त होऊ शकतात. जर तुम्ही गाडीची टाकी फुल्ल करणार असाल तर आधी पेट्रोल आणि डिझेलचे आजचे नवे दर जाणून घ्या...  

देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने चढ-उतार होत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती नेहमीच बदलतात. मात्र मिळालेल्या माहितीनुसार नवीन वर्षात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी घट होण्याची शक्यता आहे. यामध्ये तेलाच्या किमतीचा भाव एक ते दहा रुपयांनी कमी होऊ शकतात. मागील वर्षभरात देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. आज,  30 डिसेंबर सकाळी WTI क्रूडच्या किंमतीत मोठी घसरण झाली तर प्रति बॅरल किंमत $74.06 आहे. ब्रेंट क्रूड 1.42 डॉलरने घसरले असून प्रति बॅरल 79.65 डॉलरवर पोहोचले आहे. देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर जाहीर केले आहेत

 

मागे

यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारांसाठी प्रवेशिका, पुस्तके पाठविण्याचे आवाहन '
यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारांसाठी प्रवेशिका, पुस्तके पाठविण्याचे आवाहन '

'सरफोजीराजे भोसले बृहन्महाराष्ट्र पुरस्कारा’साठी महाराष्ट्र परिचय क....

अधिक वाचा

पुढे  

‘धारावीतील ‘त्या’ झोपड्यांना जमीनदोस्त करा’, मुंबई महापालिकेचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
‘धारावीतील ‘त्या’ झोपड्यांना जमीनदोस्त करा’, मुंबई महापालिकेचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

धारावी पुनर्विकास प्रकल्पावरुन मुंबईतलं राजकारण तापलं आहे. असं असताना मुं....

Read more