By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 09, 2019 12:42 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
गेल्या काही दिवसांपासून पेट्रोलच्या दराने वर्षभरातील उच्चाकी पातळी गाठली आहे. पेट्रोलच्या दरात ९ पैसे वाढ झाली असून, डिझेल २६ पैशांनी महागले आहे. रविवारी तेल मार्केटिंग कंपन्यांनी इंधनदरात कोणतीही वाढ केली नव्हती. मात्र, सोमवारी यात वाढ करण्यात आली आहे.
मुंबईत पेट्रोलचा भाव प्रति लीटर ८० रूपये ६५ पैशांवर पोहोचला आहे. तर डिझेल ६९ रूपये २७ पैसे प्रति लीटर या दराने विकले जात आहे. दिल्ली, हैदराबाद आणि बंगळुरूच्या तुलनेत मुंबईकरांना पेट्रोलसाठी सर्वाधिक फटका बसला असुन दिल्लीत पेट्रोलचा भाव ७५ रुपये एवढा आहे. तर डिझेलचा दर ६६.०४ रूपयांवर आहे.
दरम्यान, दर कमी आकारला जात असल्याने दिल्लीकरांना पेट्रोल आणि डिझेल स्वस्तात मिळत आहे. सौदी अरेबियाने तेल उत्पादनात घट करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर इंधन दर वाढणे अपेक्षित होते. कच्च्या तेलाचे भाव तीन महिन्यांच्या उच्चांकावर आहेत.
उन्नाव बलात्कार पीडित तरुणीला आज तिच्या गावात अंतिम निरोप दिला जाणार आहे. द....
अधिक वाचा