ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

सोन्याच्या दागिन्यांसह चोरीला गेलेला माल पोलिसांकडून परत

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 09, 2020 05:25 PM 2019-02-12T14:15:30+5:30

सोन्याच्या दागिन्यांसह चोरीला गेलेला माल पोलिसांकडून परत

शहर : पुणे

         पुणे -  आजकाल चोरीच्या घटनांनामध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. पिंपरी-चिंचवड परिसरातील वेगवेगळ्या परिसरातून सोनसाखळी हिसकावणे, रोख रक्कम पळवणे अशा घटना घडल्या होत्या. त्यात हजारो रुपयांच्या मौल्यवान वस्तू, सोन्याचे दागिने चोरीला गेले होते.


      या प्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानुसार संबंधित पोलीस अधिकारी, कर्मचारी यांनी विशेष तपास करत मूळ मुद्देमाल हस्तगत केला आणि आरोपीला बेड्या ठोकल्या.


        दरम्यान, महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे चे निमित्त साधून मूळ मालकांना लाखो रुपयांचा ऐवज पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांच्या हस्ते परत करण्यात आला आहे. यात मोबाईल फोन, ५८ तोळे सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा ऐकून ४७ लाख रुपयांचा मौल्यवान वस्तू तसंच सोन्याच्या दागिन्यांचा समावेश होता. मुद्देमाल मिळवून देणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना एक हजार रुपयांचे बक्षीसदेखील पोलीस आयुक्तांनी जाहीर केले.


    “फिरायला जात होते, अचानक दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी एकाने मंगळसूत्र हिसकवले आणि पळून गेला. मंगळसूत्र मिळाल्याने खूप आनंद झाला आहे. खूप मेहनतीने ते मंगळसूत्र केलेले आहे. पोलिसांचे आभार मानते.” अशी अनिता पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. पोलिसांनी केलेल्या या कृत्यामुळे स्थानिक नागरिक तसेच तक्रारदारांचा आनंद गगनात मावेनासा झाला. 
 

मागे

‘आयएस’च्या तीन संशयित दहशतवाद्यांना अटक 
‘आयएस’च्या तीन संशयित दहशतवाद्यांना अटक 

      नवी दिल्ली – ‘आयएस’च्या तीन संशयित दहशतवाद्यांना आज सकाळी दिल....

अधिक वाचा

पुढे  

सिद्धिविनायक मंदिर दर्शनासाठी १५ ते १९ जानेवारीपर्यंत बंद राहणार
सिद्धिविनायक मंदिर दर्शनासाठी १५ ते १९ जानेवारीपर्यंत बंद राहणार

       मुंबई – सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाचं १५ जानेवारी ते १९ जानेवा....

Read more