By PRIYANKA BAGAL | प्रकाशित: एप्रिल 28, 2019 05:22 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : पुणे
पुण्याहून चिंचवडकडे आलेल्या बस मधून मोठा आवाज आल्याची घटना घडली. आणि चिंचवड मधील चापेकर चौकात नागरिकांची धावाधाव सुरू झाली. कोणाला काहीच कळेना नक्क्की काय झाले याचा अंदाजही कोणाला आला नाही. तर, बसमधून प्रचंड मोठा आवाज आल्याने प्रवासी आणि परिसरातील नागरिकांची घबराहाट झाली. बसच्या मागील बाजूचा टायर फुटल्याने हा आवाज आला होता. या घटनेत बसचा पत्रा फाटल्याने बस मधील एक महिला प्रवासी गंभीर जखमी झाली. ही घटना सायंकाळी चार वाजता घडली होती.
अत्यंत वर्दळीच्या असणाऱ्या या चौकात बस मधून अचानक मोठा आवाज आल्याने नागरिकांची धावपळ झाली. चौकात उभ्या असणारे काही टेम्पो आणि रिक्षा चालक बसच्या दिशेने धावले. बसचा मागील बाजूचा टायर फुटल्याने बस मधील प्रवाशांना याचा हादरा बसला. बस थांबताच प्रवासी सैरावैरा धावू लागले. या आवाजाचा हादरऱ्याने बसचा अक्षरशः पत्रा फाटला. बसच्या मागील बाजूस बसलेली एका महिला प्रवासी या घटनेत गंभीर जखमी झालीय.
तसेच,घटनास्थळी चिंचवड पोलीस उपस्थित झाले. त्यांनी या जखमी महिलेला उपचारासाठी वायसीएम रुग्णालयात दाखल केले आहे. चौकात घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली असून, जखमी महिलेची अद्याप ओळख पटली नाही. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.
लोकसभा निवडणूकीची देशात रणधुमाळी सुरू आहे. अशातच सोशल मीडियावर भाजपचे ज्ये....
अधिक वाचा