By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑक्टोबर 01, 2019 03:05 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ उद्यापासून 100 टक्के प्लॅस्टिकमुक्त होणार आहे. उद्या (2 ऑक्टोबर) गांधी जयंतीपासून देश प्लॅस्टिकमुक्त करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केले होते. त्याच पार्श्वभूमीवर जीव्हीकेने विमानतळ पूर्णपणे प्लॅस्टिकमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.
देशभरातील 129 विमानतळ प्लॅस्टिकमुक्त करण्याचा निर्णय भारतीय विमानतळ प्राधिकरणाने घेतला होता. त्यापैकी 35 विमानतळांवर या निर्णयाची अंमलबजावणी झाली. उद्यापासून मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ प्लॅस्टिकमुक्त होणार आहे.
उद्यापासून मुंबई विमानतळावर सर्व एकल वापराच्या प्लॅस्टिकविरोधात प्लॅस्टिक उत्पादनांना बंदी असणार आहे. यामध्ये थर्माकोलपासून बनवलेली डिस्पोजेबल कटलरी (पॉलिस्टीरीन किंवा प्लास्टिक) पेट बॉटल्स (200 एमएलपेक्षा कमी), प्लॅस्टिक बॅग (हँडल शिवाय आणि हँडल असलेल्या), स्ट्रॉ, थर्मोकोल आयटम्स आणि बबल रॅप यांचा समावेश आहे. याऐवजी जीव्हीके लाउंजमध्ये स्टीलचे स्ट्रॉ, कटलरी आणि अन्य बायोडिग्रेडेबल मटेरिअलच्या वस्तू, कापडी पिशव्या वापरल्या जाणार आहेत.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने काही नवीन नियुक्तींची घोषणा के....
अधिक वाचा