ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

कोरोनाला रोखण्यासाठी उपाय सुचवा; मोदींचे जनतेला आवाहन

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 17, 2020 03:02 PM 2019-02-12T14:15:30+5:30

कोरोनाला रोखण्यासाठी उपाय सुचवा; मोदींचे जनतेला आवाहन

शहर : देश

देशभरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे सरसावले आहेत. नरेंद्र मोदी यांनी सोमवारी संध्याकाळी ट्विट करून देशातील जनतेला कोरोनाचे उच्चाटन करण्याच्यादृष्टीने महत्त्वपूर्ण आवाहन केले आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेकजण #COVID19 च्या उपचारासाठी उपाय सुचवत आहेत. या सर्वांनी आपल्या कल्पना MyGovIndia या पोर्टलवर पाठवाव्यात. त्यामुळे अनेकांची मदत होऊ शकते.

या ट्विटसोबत पंतप्रधान मोदी यांनी केंद्रीय आरोग्यमंत्रालयाच्या #COVID19 Solution Challange या उपक्रमाची जाहिरात शेअर केली आहे. कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी आरोग्य मंत्रालयाकडून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा जिंकणाऱ्याला एक लाखांचे बक्षीस मिळणार आहे.

करोना व्हायरसशी दोन हात करण्यासाठी नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने नुकतीच 'सार्क' (SAARC) देशांच्या प्रतिनिधींची व्हिडिओ कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली होती. यावेळी, 'तयार राहा, घाबरू नका, हाच आमचा मार्गदर्शक मंत्र' असल्याचे मोदींनी सांगितले. तसेच मोदी यांनी कोविड-१९ साठी एका एमर्जन्सी फंडचा प्रस्ताव सार्क देशांसमोर ठेवला. भारताकडून या फंडसाठी १ कोटी डॉलर देण्याचीही घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केली.

संपूर्ण भारतात करोनानचा प्रादुर्भाव वाढत आहे. १५ राज्यांमध्ये करोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. तर देशभरात करोनाचे ११७ रुग्ण आढळलेत. यामध्ये सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनाचे ३८ रुग्ण आढळून आले आहेत. सोमवारी राज्यभरात कोरोनाचे पाच नवे रुग्ण आढळून आले. यापैकी यवताळमध्ये एक, मुंबईत तीन आणि नवी मुंबईतील एका रुग्णाचा समावेश आहे. राज्यातील १० शहरांमध्ये कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत.

 

मागे

कोरोना व्हायरसवरील औषधाचा दावा; एप्रिलमध्ये चाचणीची शक्यता
कोरोना व्हायरसवरील औषधाचा दावा; एप्रिलमध्ये चाचणीची शक्यता

COVID-19 अर्थात कोरोना व्हायरससंबंधी एक चांगली बातमी समोर आली आहे. कोरोना व्हायर....

अधिक वाचा

पुढे  

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत
कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत

– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्य....

Read more