By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 25, 2020 11:51 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केंद्र सरकारने पंतप्रधान किसान सन्मान योजना सुरू केली, मात्र या योजनेचा लाभ काही अपात्र व्यक्तीने घेतल्याचं समोर आल्यानं खळबळ उडालीय. या अपात्र लाभार्थ्यांकडून ही रक्कम परत घेण्यासाठी सरकारकडून मोहीम राबवण्यात येत आहे. या अंतर्गत वाडा तालुक्यातील 188 अपात्र लाभार्थ्यांकडून 18 लाख 36 हजार रुपयांची वसुली करण्यात आलीय.
पीएम किसान योजनेचा वाडा तालुक्यातील 544 अपात्र व्यक्तींनी गेल्या दोन वर्षांपासून लाभ घेतला असून, अशा अपात्र लाभार्थ्यांना पैसे परत जमा करण्यासाठी वाडा तहसीलदारांनी नोटीस बजावल्यात. पीएम किसान सन्मान योजनेतून तालुक्यातील अशा अपात्र व्यक्तींना आत्तापर्यंत 55 लाख वाटप झालेय. ही रक्कम वसूल करण्यासाठी संबंधितांना तहसीलदार कार्यालयाकडून नोटिसा बजावण्यात आल्यात.
केंद्र सरकारची पंतप्रधान किसान सन्मान योजना देशभरात सुरू आहे. या योजनेंतर्गत गेल्या दोन वर्षांपासून एक डिसेंबर 2018 पासून शेतकऱ्यांना प्रतिवर्षी सहा हजार रुपयांचा निधी चार महिन्यांच्या अंतराने प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या स्वरूपात शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केला जातो, वाडा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेचे 21 हजारांहून अधिक लाभार्थी आहेत. या योजनेतून घटनात्मक पदावरील व्यक्ती, आजी-माजी लोकप्रतिनिधी, नोकरीतील निवृत्त सरकारी कर्मचारी, करदाते, डॉक्टर, इंजिनीअर्स, वकील, सनदी लेखापाल, गरजू शेतकरी नसलेल्यांना व्यक्तींना या योजनेतून वगळण्यात आले आहे. मात्र असे असतानाही वाडा तालुक्यातील 544 अशा व्यक्तींनी दोन वर्षांत शासनाचे या योजनेतून 55 लाख रुपये लाटले असल्याचे उघड झालेय.
किसान सन्मान योजनेचा सातवा हप्ता 25 डिसेंबरला जमा होणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकार ‘पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेतील’ 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर 25 डिसेंबर पासून वर्ग करणार आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता 11.17 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येईल, अशी माहिती यापूर्वी देण्यात आली होती.
पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi) या योजनेंतर्गत वर्षाला तीन हप्त्यांमध्ये 6000 रुपये शेतकऱ्यांना दिले जातात. योजना सुरु झाल्यापासून आतापर्यंत शेतक-यांना सहा हप्ते पाठवण्यात आले आहेत. गेल्या 23 महिन्यांत केंद्र सरकारने 11.17 कोटी शेतकर्यांच्या खात्यावर 95 कोटी रुपयांहून अधिक मदत जमा केली आहे.
पीएम किसान सन्मान योजनेत केंद्र सरकार हे पैसे तीन हप्त्यांमध्ये वर्ग करते. पहिला हप्ता 1 डिसेंबर ते 31 मार्च या कालावधीत येतो, तर दुसरा हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलै दरम्यान आणि तिसरा हप्ता 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबरदरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतो. मात्र, यासाठी शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँक खात्यांशी लिंक असणं आवश्यक आहे.
कोरोना विषाणू संक्रमण रोखण्यासाठी मास्कचा नियमित वापर अत्यावश्यक आहे. या न....
अधिक वाचा